Home जळगाव फैजपूर नगरपरिषदेने दिला रांगोळी स्पर्धेतुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश

फैजपूर नगरपरिषदेने दिला रांगोळी स्पर्धेतुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश

374

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील फैजपूर नगरपरिषदेने दिला रांगोळी स्पर्धेतुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व “माझी वसुंधरा अभियानास प्रारंभ झाला असून शासनाच्या निसर्ग बचाव कार्यक्रम अंतर्गत फैजपूर नगरपरिषद मार्फत “स्वच्छ सर्वेक्षण २०२१” व “माझी वसुंधरा अभियान” राबविण्यात येत आहे. मागील वर्षी नागरिकांच्या सहभागामुळे स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये फैजपूर शहराने वेस्ट झोन मध्ये रँकिंग ८२ मिळवली होती. यावर्षी देखील आपल्या सहभागामुळे स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियान मध्ये सर्वोत्तम कामगिरी करुन आपली रँकिंग उंचावणे हे उदिष्ट आहे. त्याअनुषंगाने सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी व शहरातील महिलांसाठी दिनांक २२/०१/२०२१ शुक्रवार रोज़ी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत रांगोळी स्पर्धा म्युनिसीपल हायस्कुल, फ़ैजपूर आयोजित करण्यात आली होती. शालेय विद्यार्थी व महिला यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत स्वच्छ फैजपूर व सुंदर फैजपूर, माझी वसुंधरा (पृथ्वी संवर्धन), प्रदुषण मुक्त फैजपूर माझे, हगणदारी मुक्त फैजपूर माझे व प्लास्टिक बंदी या विषयावर सुंदर रांगोळी काढाली.यावेळी फैजपूर नगरपरिषदेचे श्री. किशोर अशोकराव चव्हाण (मुख्याधिकारी), महानंदा रविंद्र टेकाम (अध्यक्षा), नयना चंद्रशेखर चौधरी ( उपाध्यक्षा), समाजसेवक रविंद्र होले, समाजसेवक चंद्रशेखर चौधरी विपुल दिलीप साळुंके, संगिता बाक्षे, सुधिर चौधरी, अश्विनी खैरनार, म्युनिसिपल हायस्कुल चे मुख्याध्यापक आगळे सर, अतुल महाजन सर इत्यादी उपस्थित होते.