Home विदर्भ वडनेर ग्रामपंचायतीच्या सभागृहात विकासात्मक कामा ऐवजी फुगडी फू..

वडनेर ग्रामपंचायतीच्या सभागृहात विकासात्मक कामा ऐवजी फुगडी फू..

198
0

योगेश कांबळे

वर्धा जिल्ह्यातील हिगंणघाट तालुक्यातील वडनेर ग्राम पंचायत मधे सरपंच यांनी महिलांना बोलाविलेल्या हळदीकुंकु कार्य क्रमाला महिलांना विकासात्मक तसेच महिलांचे जीवनमान उंचावण्याच्या कार्य क्रमा ऐवजी फुगडी खेळण्याला प्राधान्य दिल्या मुळे महिलांचे प्रश्न कसे सोडविणार यांवर प्रश्न चिन्ह निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
शासनाने कोरोना काळासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना काही निर्बंध घातलेले आहेत. परंतु, येथील ग्रामपंचायत सरपंच आणि काही सदस्यांनी याचा वेगळा अर्थ काढून काल दिनांक 22 जानेवारी रोजी पार पडलेल्या एका कार्यक्रमादरम्यान चक्क ग्रामपंचायत सभागृहात नाचत ‘ फु बाई फु , फुगडी फु’ चा खेळ करुन शासनाच्या निर्बंधांना पायदळी तुडविण्यात आले. या मुळे गावात व परिसरात एकच चर्चा असून फुगडी खेळण्याचा चर्चेचा विषय चर्चिला जात आहे.
राज्यातील जनतेचा विकास करण्याकरीता शपथ घेणाऱ्या आणि नियमानुसारच कामे करणाऱ्या ठाकरे सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार हे त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरपंचाने केलेल्या या गंभीर गैर कृत्याची दखल घेऊन कठोर कारवाई करतील का ? याकडे गावातील सर्वांच्या नजरा लागलेल्या आहे.
विधान परिषद आमदाराचे आणि पंचायत समिती सभापती यांच्या सुमारे 10 हजाराचे वर लोकसंख्या असलेल्या हिंगणघाट तालुक्यातील वडनेर या गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाची ग्रामपंचायत मध्ये सत्ता आहे. येथील महिला सरपंचाने स्वमर्जीने काही सदस्यांना हाताशी धरून काल दिनांक 22 जानेवारी ला ग्रामपंचायत कार्यालयात संक्रांति निमित्त गावातील महिलांना एकत्र करून हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमादरम्यान सरपंच बाईच्या आग्रहास्तव काही महिलांनी चक्क सभागृहातच नाचत फुगड्यांचा खेळ केला. सुमारे तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाची गावात व परिसरात सार्वजनिक स्थळी उलट सुलट चर्चा आहे. एकीकडे शासनाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू असून कोरोना चे सावट कायम असल्याने ग्रामसभेला ३१ मार्च पर्यंत स्थगिती देण्यात आली. मात्र, दुसरीकडे वडनेर येथील सरपंचाने ग्रामपंचायत कार्यालयात शेकडो महिलांना गोळा करून सरपंचाने सदर कार्यक्रम पार पाडला. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.