Home विदर्भ देवळीच्या युवा संघर्ष मोर्चाच्या टीमने घेतली राज्याच्या गृहमंत्र्यांची भेट

देवळीच्या युवा संघर्ष मोर्चाच्या टीमने घेतली राज्याच्या गृहमंत्र्यांची भेट

236

योगेश कांबळे

भेटी दरम्यान दिले भूमीपुत्रांच्या रोजगारसबंधी व महालक्ष्मीच्या जीवघेण्या प्रदूषणाबाबत दिले निवेदन.

 

वर्धा –  महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख वर्धा व यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.आज दुपारी ३ वाजता देवळी मार्गे बायपासने यवतमाळ येथे जाणार असल्याने युवा संघर्ष मोर्चाच्या टीमने त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्या नियोजित दौऱ्यात देवळीतील भेट नसतांना सुद्धा त्यांनी देवळीच्या विश्रामगृहावर युवा संघर्ष मोर्चाच्या टीमशी भेटण्याचे ठरविले.
ठरल्याप्रमाणे गृहमंत्री अनिल देशमुख विश्रामगृहावर आले व त्यांचे युवा संघर्ष मोर्चाच्या टीमने हर्षउल्हासात स्वागत केले.
यावेळी गृहमंत्र्यांसोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व त्यात प्रामुख्याने देवळी औद्योगिक वसाहतीतील बेरोजगार भूमीपुत्रांची रोजगारासाठी होत असलेली फरफट थांबविण्यासाठी,महालक्ष्मी कंपनीचे जीवघेणे प्रदूषण बंद करण्याबाबत व कामगारांना साप्ताहिक सुट्टी देत नसून ३६५ दिवस १२ तास काम करवून घेत शारीरीक पिळवणूक करणाऱ्या कंपनी व ठेकदारांवर कारवाई कारण्याबत त्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.गृहमंत्र्यांनी त्यांच्या व्यस्त दौऱ्यातून वेळ काढत युवा संघर्ष मोर्चाच्या टीमची भेट घेतली याकरिता गृहमंत्री अनिल देशमुखांचे युवा संघर्ष मोर्चाने त्यांचे आभार मानले.यावेळी किरण ठाकरे, प्रवीण कात्रे,गौतम पोपटकर,सचिन मांडवकर,गौरव खोपाळ,सुमित झोरे,श्याम रुद्रकार,सतीश राऊत,अमोल झाडे,दिलीप वाघमारे,बळीराम वैद्य,सागर पाटणकर,मनीष आदमने,मोहित खोसे,मोहम्मद शेख यांची उपस्थिती होती.