Home विदर्भ वर्धा जिल्हात रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाचा शुभारंभ

वर्धा जिल्हात रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाचा शुभारंभ

57
0

ईकबाल शेख

वर्धा संपूर्ण देशात  18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधित  एक महिना रस्ता सुरक्षा  जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांचा शुभारंभ जिल्हयात खासदार रामदास तडस यांचे हस्ते  प्रशासकिय भवन परिसरात  रस्ता सुरक्षा जनजागृती  प्रदर्शनीचे फित कापून व  चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.

शुभारंभ करतांना खासदार रामदास तडस

यावेळी  विधी सेवा प्राधिकरणचे सचिव निशांत परमा, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  विजय तिराणकर, उपविभागीय पोलिस अधिकारी  (अतिरिक्त) गृह संतोष खांडेकर,वाहतुक नियंत्रण शाखेचे  पोलिस निरिक्षक  श्री. कडू,  मोटार वाहन निरिक्षक नरेंद्र कठाणे,  सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक  मंगेश राठोड  यांची उपस्थिती होती.

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान  18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधित रस्ता सुरक्षा संबंधी विविध जनजागृती पर  कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये  वाहन विक्री करणा-या शोरुममध्ये  फ्लेक्स लावणे, रस्ता सुरक्षा प्रशिक्षण,  शिकाऊ व  पक्की अनुज्ञप्तीसाठी येणा-या  उमेदवारांना  रस्ता सुरक्षा विषयक  चित्रफितीव्दारे मार्गदर्शन, माहिती पत्रकाचे वाटप,  मदयप्राशन करुन वाहन चालविणा-या,  वाहनांच्या काचावर काळी फित लावणा-या, मर्यादेपेक्ष अतिवेगाने वाहन चालविणा-या  वाहनांवर कारवाई, चौक सभा, वाहतुक नियमाचे  उल्लघंन करणा-या वाहन चालकांचा पुष्प गुच्छ देऊन  मार्गदर्शन करण्यात येणार आहे. रस्ता सुरक्षा प्रबोधन, वाहनांना रिप्लेक्टर लावणे,  वाहन धारकाची आरोग्य तपासणी,  नेत्रतपासणी, मोफत पी.यु.सी. तपासणी, वाहन चालकांना प्रथोमोपचार मार्गदर्शन, मोटार वाहन कायदयातील सुधारणा बाबत मार्गदर्शन, वाहन विम्याबाबत मार्गदर्शन, प्रवासी वाहनातुन प्रवास करणा-या महिलांना मार्गदर्शन, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सुरक्षित रस्ते अपघात स्थळाबाबत परिसंवाद आदी कार्यक्रमाचा सहभाग असणार आहे.

17 फेब्रुवारीला सकाळी  11.30 वाजता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे  अभियानाचा समारोप  करण्यात येणार आहे.