Home विदर्भ देवळी येथे महिला सक्षमिकरण मेळाव्याचे आयोजन

देवळी येथे महिला सक्षमिकरण मेळाव्याचे आयोजन

136

योगेश कांबळे

वर्धा –  देेवळी येथे 13 जानेवारी रोजी केअर इंडिया आयोजित ईन्टर फेस मिटिंग चे आयोजन करण्यात आले होते. केअर इंडिया ही संस्था मागिल दोन वर्षांपासून देवळी तहसील मध्ये वुमन प्लस वाटर वर ग्रामीण भागात काम करत आहे. चार हजाराहुन ही अधिक महिलांना महिला सक्षमीकरणाचे धडे देण्यात आले आहेत.

महिलाची प्रगती व तिच्या कारकिर्दीचा विकास पेस माड्युलच्या माध्यमातून महिलांचे लर्निंग ग्रुप तयार करून कुटुंबातील आलेल्या लहान मोठ्या समस्यांना कस सामोरे जाता येईल, वेळेच नियोजन,तानतनाव कमी करुन आपल आयूष्य समाधानकारक कस जगता येईल. एकमेकांच्या मदतीला कस जाता येईल,प्रभावी संवाद कसा साधता येईल. या कौटुंबिक बाबीवर अकरा माड्युलच्या माध्यमातून प्रत्येक गावात सहा महिने ट्रेंनिग च नियोजन करून पसतीस सत्राच्या माध्यमातून, महिला सक्षमीकरणाचे धडे देण्यात येत आहेत.
ज्या महिला पुरुष प्रभावी संवाद साधत आसतील सहज समस्येवर मात करत आसतील, सर्व शीकलेले माड्युल आचरणात आणत आसतील तर,पेस मेल व वुमन च्यांपियन निवडुन त्यांच्या कामगिरी च प्रशस्तीपत्र त्याना बहाल करण्यात येते. संपुर्ण तालुक्यातील महिलाची एकमेकांशी भेटण्याची ईच्छा पुर्ण व्हावी आप आपसातील विचाराची देवान घेवाण व्हावी.या ऊद्देशाने या बैठकिचे आयोजन केले होते.या बैठकीला, पत्रकार सामाजिक कार्यकर्ते किरण ठाकरे,पंचायत समितीचे टेक्नीकल विस्तार अधिकारी विजय पचारे,उमेदचे ब्लाक आफिसर संजय राऊत केअरचे देवळीचे एफ सी,भुषन कडु,सेलुचे योगेश ढोक,हिंगणघाटचे शंकर नाकतोडे,तसेच केअरची संपुर्ण टिम उपस्थित होती.ग्रामीण भागातील केअरच ट्रेनिंग घेणाऱ्या महिलाची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.रविकांत घाटोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली .शेवटी अभार प्रदर्शन केअरचे ट्रेनर प्रमोद कापसे यांनी केले.