Home मराठवाडा घनसावंगी तालुक्यात संत जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम

घनसावंगी तालुक्यात संत जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम

60
0

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्यात संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सर्वत्र विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील श्री कानिफनाथ मंदिरात दुपारी एक वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.गावातून संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त उत्सवाचे स्वरूप आले होते.तेली समाजबांधवांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावाने पुण्यतिथी साजरी करण्यासाठी एकत्र येऊन भक्तीभाव प्रकट केला .संत संताजी जगनाडे महाराज युवा मंचच्या वतीने सर्व भाविक भक्तांनी सहभागी होवून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.महीलांनी घरासमोर सडा टाकून रांगोळी काढली होती.महाप्रसादाच्या कार्यक्रमाने सांगता झाली.

Unlimited Reseller Hosting