Home जळगाव गौरखेडा येथे शांतता कमेटीची बैठक ग्रा.प. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संपन्न….

गौरखेडा येथे शांतता कमेटीची बैठक ग्रा.प. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संपन्न….

273

जळगाव / ता. रावेर – गौरखेडा गावात आज दि, 10/1/2021 रोजी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सावदा पुलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री देविदास इंगोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली, यावेळी सामाजिक कार्यकर्ते, महेंद्र पाटील यांनी सविस्तर माहिती दिली व गौरखेडा गावात तीन वार्ड मध्ये निवडणूक होत असून ती सुध्दा कायद्याच्या परिपूर्ण अंमलबजावणी, तंतोतंत नियम अटींचे पालन करून शांततेत सर्व गावकरी मंडळी पार पाडतील अशी ग्वाही समस्त गौरखेडा गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत दिली.

यावेळी अहमद तडवी, गफुर तडवी, महेंद्र पाटील, साहेब राव पाटील, कैलास पाटील पोलीस पाटील ,बाळू महाजन, सुधाकर महाजन, सचिन पाटील, दिनकर पाटील, सलिम तडवी, गुलशेर तडवी, वसिम तडवी, जानकी राम पाटील, हरचंद भालेराव, पंडित भालेराव, नरेंद्र भालेराव, सह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.