Home विदर्भ अकोट अकोला महामार्गावर गौरव हॉटेल जवळ ट्रक व मॅक्झिमो चा अपघात 5...

अकोट अकोला महामार्गावर गौरव हॉटेल जवळ ट्रक व मॅक्झिमो चा अपघात 5 जण गंभीर जखमी

96
0

अकोट अकोला रोडवर अपघाताचे सत्र सुरुच

अकोट प्रतिनिधी कुशल भगत

अकोला – अकोट अकोला या महामार्गावर गौरव हॉटेल जवळ ट्रक व मॅक्झिमो चा अपघात झाला असून पाच जण गंभीर जखमी आहेत मॅक्झिमो क्रमांक MH 30 AZ 0925 अकोल्यावरून अकोट कडे लग्नासाठी जात असताना ट्रक क्रमांक MH 30 AH 0118 यांची समोरासमोर धडक झाली मॅक्झिमो मधील 5 जण गंभीर जखमी असून त्यांना अकोट ग्रामीण रुग्णालयातून अकोला येथे रेफर करण्यात आले व ट्रक ड्रायव्हरला अकोट शहर पोलिस स्टेशनला नेण्यात आले हा 407 ट्रक अकोट कडुन चोहट्टा बाजार येथे लाकडे घेऊन जात होता यामध्ये राजनुर बी हुसेन शहा वय 55 वर्ष, मोहम्मद जुबेर मोहम्मद इरकज वय 28 वर्ष, शकीला बी हनीफ शहा वय 55 वर्ष, ताजिया हुसेन शहा वय 28 वर्ष, हमीदा बानो महबूब वय 42 वर्षे हे राहणार सर्व अकोला यांना जबर मारहाण असल्यामुळे यांना अकोला येथे रेफर करण्यात आले आहे पुढील तपास अकोट शहर पोलिस करत आहेत. तरी अकोट अकोला या मार्गावर बरेच अपघात झाले आहेत व होत आहेत तरी या मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी होत आहे.