Home जळगाव फैजपूर येथे पत्रकार दिन मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा

फैजपूर येथे पत्रकार दिन मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा

212

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील फैजपूर , पत्रकारांचे संघटन मजबूत असावे तसेच लेखणीला स्वतंत्र आणि चौथ्या स्तंभाची जाण ठेवून पत्रकारांनी काम करा व सकारात्मक बातम्यांना प्रसिद्धी द्यावी असे प्रतिपादन महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले ते फैजपूर शहरातील पत्रकारांतर्फे साजरा करण्यात आलेल्या पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

फैजपूर पत्रकार संस्था कार्यालयात दि ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त फैजपूर शहरातील पत्रकारांतर्फे छोटे खानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे जनार्दन हरीजी महाराज, फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन हरीजी महाराज होते.त्यांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना निरोगी निरामय दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलक यांनी पत्रकार दिनाचे व आणि पत्रकारांचे स्थान कायम आहे भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून पत्रकारांनी काम करावे असे त्यांनी यावेळी आव्हान केले. या कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे, जेष्ठ पत्रकार अरुण, फैजपूर पत्रकार संस्था अध्यक्ष शेख फारूक मण्यार व्यासपीठावर होते.यावेळी फैजपुर पत्रकार संस्थेतर्फे फैजपुर शहरातील पत्रकारांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आला.कार्यक्रमाला फैजपुर पत्रकार संस्था अध्यक्ष फारुक शेख, ज्येष्ठ पत्रकार वासुदेव सरोदे, समीर तडवी, प्रा. उमाकांत पाटील, प्रा. राजेंद्र तायडे, नंदकिशोर अग्रवाल, संजय सराफ, सलीम पिंजारी, राजू तडवी, मयूर मेढे, निलेश पाटील, इदु पिंजारी, शाकीर मलक मुसा, कामिल शेख, जावेद काझी, फोटोग्राफर मिलिंद महाजन,मुद्दसर नजर हे पत्रकार उपस्थित होते
नजमोद्दीन शेख रावेर, आरिफ शेखअशोक भालेराव,विकास वाणी यांनी कार्यक्रमाला भेट दिली यशश्वितेसाठी मुबारक तडवी,देवेंद्र झोपे,बंटी आंबेकर, विकास वाणी,मोईद्दीन मामु यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले.
‘याठिकाणी पत्रकारांचा सन्मान’
पत्रकार दिनाचे औचित्य साधून सतपंथ चॅरिटीबल ट्रस्ट व सतपंथ संस्थान वढोधा यांच्या संयुक्त विद्यमाने फैजपूर शहरातील पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गादीपति जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते उपस्थित पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी जळगांव चे आ राजुमामा भोळे,माजी नगराध्यक्ष निलेश राणे उपस्थित होते यावेळी ‘पत्रकारितेचे बदलते स्वरूप व मूल्याधारीत पत्रकारिता या विषयावर लाईव्ह ट्रेंडचे संपादक शेखर पाटील यांचे मार्गदर्शन संपन्न झाले,तसेच पिंपरूड येथे सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हे मित्र मंच यांच्यातर्फे पदक देऊन पत्रकारांचा सन्मान व वैद्यकीय क्षेत्रातील अंगणवाडी सेविका यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला यावेळी प्रांताधिकारी कैलास कडलक,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे आदी उपस्थित होते.खानदेश नारी शक्ती तर्फे सौ. दीपाली झोपे यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करून पत्रकारांचा अपघात जीवन विमा काढण्याचे फार्म भरण्यात आले. फैजपूर पोलीस ठाण्यातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.