Home जळगाव गौरखेडा ग्रामपंचायत च्या सात जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात…

गौरखेडा ग्रामपंचायत च्या सात जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात…

48
0

रावेर (शरीफ शेख)

तालुक्यातील येथील ग्रामपंचायतची निवडणूक येथे एकूण तीन वार्डा साठी सात जागा असून 14 उमेदवार रिंगणात उतरल्याने तीनही वार्डात सरळ लढती होणार असल्याने ऐन थंडीत राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की गौरखेडा येथे तिन्ही वार्ड मिळून एकूण सात जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात उतरले असल्याने सरळ लढती होणार आहेत. त्यात बहुतांशी उमेदवार नवखे असून काही जुने मातब्बर देखील मैदानात असल्याने निवडणूक चुरशीची होणार हे मात्र नक्की. त्यात वार्ड 1 क्रमांक एक अनु जमाती महिला राखीव जागेसाठी नशीबा फिरोज तडवी व तडवी जरीना बशीर अनु जमाती पुरुष जागेसाठी तडवी कुतुबुददीन खुदाबक्ष व सलिम रहेमान तडवी, तर ना मा प्र.महिला राखीव जागेसाठी महाजन मंगलाबाई बाबुराव व भारती भानुदास पाटील,हे उमेदवार रिंगणात आहेत.

तर वार्ड क्रमांक 2 मधून अनु,जमाती पुरुष राखीव तडवी गफूर हसन व वसीम ईस्माईल तडवी, व अनु जमाती स्त्री राखीव जागेसाठी तडवी शबाना रफीक व बुगा बाई हबीब तडवी अशी लढत आहे.

तर वार्ड क्रमांक 3 मधून अनुसूचित जमाती महिला राखीव जागेसाठी भालेराव ज्योती राजू व भालेराव सुमित्रा रविंद्र व तर ना.मा.प्र पुरुष राखीव जागेसाठी महेंद्र मधुकर पाटील व साहेब राव सदाशिव पाटील, चुरशीची लढत होणार आहे आहेत,खरा सामना पॅनलच्या प्रमुखांमध्ये यात भाजपचे अहमद तडवी तर काँग्रेसचे गफुर तडवी यांच्यात रंगणार आहे. त्यामुळे ग्रामस्थ कोणाच्या बाजूनं कौल देतात व कोण सत्ता काबीज करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.तसेच आज हनुमानाच्या मंदिरात प्रचाराचे सर्व उमेदवारांनी आशिर्वाद घेऊन नारळ फोडले, संपूर्ण गावात प्रचार रॅली काढण्यात आली, यावेळी बलदार तडवी, दिनकर पाटील टेलर, गोविंदा पाटील, अनिल पाटील, रविंद्र भालेराव, सुनिल भालेराव, भागवत भालेराव, दिलीप पाटील, विजय पाटील, प्रकाश पाटील, सुधाकर पाटील, देविदास भालेराव, सुनील भालेराव, श्रावण भालेराव, जहाबीर तडवी, उस्मान तडवी, छब्बीर तडवी, सादिक तडवी, अर्जुन भालेराव, सुलेमान तडवी, फत्तु तडवी, सागर भालेराव, अजय भालेराव, पंडित भालेराव, जानकी राम पाटील, नरेंद्र पाटील, रविंद्र पाटील,सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.