
रविन्द्र साखरे
➡️ सत्यनारायणजी बजाज सार्वजनिक वाचनालय येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती व पत्रकार दिनानिमित्त पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य वर्धा विभागाकडुन ग्रामीण भागातील तळागळातील समाजासाठी उत्कृष्ट पत्रकरिता करणाऱ्या व कोरोणा काळात समाजासाठी सदैव धडपडणाऱ्या समाजसेवकांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी रामदासजी तडस,खासदार वर्धा,सांवगी मेघे रुग्नालयाचे विशेष कार्यकरी अधिकारी अभ्युदय मेघे,जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.सरिताताई गाखरे,उपाध्यक्षा सौ.वैशालीताई येरावर,पत्रकार संरक्षण समिती संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे,लोकसत्ताचे प्रशांत देशमुख,हितवादचे नरेंद्र देशमुख,अमरावती जिल्हा अध्यक्ष प.स.समिती डाॅ.संघपाल उमरे,वर्धा जिल्हा अध्यक्ष रविराज घुमे,वर्धा जिल्हा कार्यध्यक्ष शेख सत्तार,सचिव योगेश कांबळे,संघटक दिलिप पिंगळे प्रमुख्याने मंचकावर उपस्थित होते.उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामिण भागातील पत्रकारांचा व कोरोणा काळात समाजासाठी सदैव धडपडणाऱ्या समाजसेवकांना सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह,शाल,व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असुन दिवस रात्र,पाऊस,थंडी,ऊन यांची तमा न बाळगता समाजासाठी स्वत: ला झोकुन टाकणारा प्राणी आहे.तरी पण पत्रकारांचे संरक्षण न करता आम्हाला संरक्षण दिले जाते.खरेतर संरक्षण पत्रकारांनाच द्यायले पाहिजे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदासजी तडस यांनी याप्रसंगी व्यक्त केले.सौ.सरितिताई गाखरे व प्रशांत देशमुख यांनीही पत्रकार दिनावर व पत्रकारांच्या समस्या वर प्रकाश टाकला,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नारायण जांरुंडे यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविराज घुमे पत्रकार संरक्षण समिती वर्धा जिल्हा अध्यक्ष यांनी केले,मोहन सुरकार यांनी आभार व्यक्त केले,विनोद महाजन,रवि साखरे,प्रकाश झांझाडे,राजु बाळापुरे,गणेश शेंडे सह वर्धा जिल्हा व तालुक्यातील पत्रकार संरक्षण समिती च्या पदधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सहकार्य व मदत केली.










































