Home विदर्भ आर्णी नजीक सरकार जिनींग व प्रेसिंग इंडस्ट्रीज चे माजी आमदार ख्वाजा बेग...

आर्णी नजीक सरकार जिनींग व प्रेसिंग इंडस्ट्रीज चे माजी आमदार ख्वाजा बेग यांच्या हस्ते थाटात उदघाटन

198

शेतकर्‍यांच्या कापसाला योग्य भाव मिळणार – माजी आमदार ख्वाजा बेग 

अयनुद्दिन सोलंकी

घाटंजी / यवतमाळ – 

बडगांव गाढवे येथील अमिन व आलम मलनस हे दोघे भाऊ शेतकरी कुटुंबात जन्मलेले असुन त्यांनी अथक परिश्रमातुन आर्णी नजीक स्वतःच्या मालकीची जिनींग उभी केली आहे. हे गौरवास्पद व अभिनंदनीय बाब असून या भागातील शेतकऱ्यांना खरोखरच कापसाला अधिक चांगला भाव मिळेल, असे प्रतिपादन माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग यांनी केले. या वेळी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी नजीक सरकार जिनींग व प्रेसिंग इंडस्ट्रीज चे उदघाटन माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग यांचे हस्ते थाटात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीमंत्री तथा आर्णीचे माजी आमदार अँड. शिवाजीराव मोघे हे प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी माजीमंत्री अँड. शिवाजीराव मोघे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर आदींचे समयोचित भाषने झाली.
🔵 कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उत्कृष्ट संचलन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी केले. विशेष अतिथी म्हणून माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक मनिष पाटील आर्णी नगर परिषदेचे माजी अध्यक्ष आरीज बेग, जवळा चे सरपंच आनंदराव दुर्गे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर, आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, सभापती रवि ढोक (यवतमाळ), जिल्हा परिषद सदस्य विनोद खोडे, पंचायत समिती सदस्य सदस्य महादेव मडावी, जिल्हा परिषद सदस्य किशोर इंगळे, विलास पाटील राउत, एन. टी. जाधव, भिकु नाईक, मनोज खोडे, गोपाळ कोठारी, श्री. गायकी साहेब, आर्णीचे नगरसेवक अन्वर पठान, नगरसेवक चिराग शाह, आर्णी जिनींग प्रेसिंग फँक्टरीचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, बक्षुमोहमंद सर्वे, हाजी महंमद सेठ मलनस, हाजी गुलमोंहमद निर्बान (दारव्हा), मिलींद रामटेके, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजु विरखेडे, जितेंद्र उर्फ बाळासाहेब मोघे, जवळा जिनिंगचे माजी अध्यक्ष गणेशराव मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुदाम खरगडे, ज्ञानेश्वर पाटील टोणे, प्रकाश अंधुरे, जवळाचे माजी उपसरपंच विनोद पंचभाई, बोरगांव जिनिंगचे संचालक रणजित राठोड, शाबु सर्वे, रोशन सोलंकी, दिलीप चिंतावार, शरीफ भाई, बाळुभाउ निलावार आदी मान्यवर उपस्थित होते.
🔵 आभार अजहर मलनस यांनी मानले. कार्यक्रमाला आर्णी, जवळा, मंगरुळ, बडगांव गाढवे, बोरी गोसावी, सावळी (सदोबा) या सह ईतर गावातील शेतकरी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.