Home विदर्भ पोलीस उपनिरीक्षक यवतमाळ एसीबीच्या जाळ्यात

पोलीस उपनिरीक्षक यवतमाळ एसीबीच्या जाळ्यात

129
0
यवतमाळ , ( प्रतिनिधी ) : – फटाक्याच्या व्यवसायीकावरील पोलीसांची रेड थांबविण्यासाठी घाटंजी येथील पोलीस उपनिरीक्षक यांनी सहा लाख रुपयांची मागणी केली असता तडजोडीअंती १ लाख रुपये देण्याचे तक्रारदार यांनी मान्य केले असता पोलीस उपनिरीक्षकास लाचेची रक्कम स्विकारीत असतांना घाटंजी पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात दिनांक ४ जानेवारी रोजी अटक केली.
    घाटंजी येथील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ त्रंबकराव घोगरे (३५) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. यातील तक्रारदार यांचा फटाक्याचा व्यवसाय असुन त्यांच्यावर पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या विशेष पथकाची रेड थांबविण्यासाठी घाटंजी येथील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ त्रंबकराव घोगरे यांनी तक्रादार यांना सहा लाख रुपयांची मागणी.केली. याबाबत तक्रारदार यांनी याची सुचना यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. दिनांक २३.११.२०२० व दिनांक २६.११.२०२० रोजी पडताळणी कार्यवाही दरम्यान आरोपी पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ त्रंबकराव घेगरे यांनी तक्रादार यांना तडजोडीअंती १ लाख रुपये लाच रक्कम पोलीस अधीक्षक यांच्या स्कॉडसाठी मागणी करुन स्वीकारण्याचे मान्य केले होते. आज दिनांक ४ जानेवारी २०२१ रोजी सापळा कारवाई दरम्यान आ.लो.से. राजाभाऊ त्रंबकराव घोगरे   पोलीस उपनिरीक्षक यांनी पोलीस स्टेशन घाटंजी येथे १ लाख रुपयाची लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्या आले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.
    सदरची कार्यवाही अमरावती परिक्षेत्र अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागचे  पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड,  अमरावती प्र.अपर पोलीस अधीक्षक गजानन पडघन आणि पोलीस उपअधीक्षक आर.बी.मुळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे व पोलीस निरीक्षक गजेंद्र क्षीरसागर आणि कर्मचारी सर्व नेमणुक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यवतमाळ यांनी केली.