Home विदर्भ सोनेगाव आबाजी येथे हायमास्ट चे उद्घाटन

सोनेगाव आबाजी येथे हायमास्ट चे उद्घाटन

35
0

योगेश कांबळे

वर्धा – देवळी तालुक्यातील सोनेगाव आबाजी येथे पंधराव्या वित्त आयोग 2020–21 अंतर्गत जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा वैशालीताई येरावार यांच्या विशेष प्रयत्नातून हायमास्ट चे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी वैशालीताई येरावार म्हणाल्या की, गाव विकासासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नसुन ग्रामस्थांची साथ हीच विकासाची कास असून गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना राबविण्या करीता आपण कटिबद्ध असल्याचे हायमास्ट उदघाटन प्रसंगी सांगितले.
ग्रामीण भागातील नागरिकांना हायमास्ट लाईट चा फायदा होवून अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग असून याच आधारे आपल्या गावाचा विकास करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला सरपंच वणीता डफरे, उपसरपंच अस्मीता बोबडे , ग्राम पंचायत सदस्य गंगाधर राऊत, योगेश नेरकर,अमोल कोवे शर्मिला गोडे,उज्वला मुन अर्चना भरणे ग्राम सचिव वैशाली गायकवाड पोलीस पाटील निखील जाधव यांच्या सह ग्राम पंचायत कर्मचारी व गावातील नागरिकांची उपस्थिती होती.