Home सोलापुर वाचनालय म्हणजे ग्रामीण भागातील विद्यापीठ – जाधव

वाचनालय म्हणजे ग्रामीण भागातील विद्यापीठ – जाधव

35
0

वागदरी – नागप्पा आष्टगी

अक्कलकोट , दि. १४ :- वाचनाल म्हणजे ग्रामीण भागातील विद्यापीठ आहे.नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी येथील पुस्तकांचा वापर बौध्दीक व मानसिक क्षमता वाढविण्यासाठी करावा असे आवाहन सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी केले .

अक्कलकोट तालुक्यातील भुरीकवठे येथे ज्ञानदान सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने महर्षी स्वामी विवेकानंद जयंती निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या गुणीजनाचे सत्कार नगरसेवक मिलन कल्याणशट्टी यांच्याहस्ते झाला .या वेळी जाधव बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सुधीर आष्टे होते .या गावचे सुपुत्र सोलापूर येथील प्रसिध्द ह्रदयरोग तञ डाॅ. संतोष गायकवाड ,वरिष्ठ प्रशासकिय अधिकारी दिलीप बनसोडे,डाॅ.श्रीकांत गुरव ,प्रा.अजित आष्टे ,शिवानंद काशेट्टी ,श्रीशैल ठोंबरे ,सुनिल सावंत मल्लिनाथ उणदे,परमेश्वर धाये ,चंद्रकांत पोतदार आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी एस एस आष्टे प्रशालेतील विद्यार्थीनीच्या ईश व स्वागत गीताने कार्यक्रम प्रारंभ झाला . नगरसेवक मिलन कल्याणशट्टी यांच्याहस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उध्दघाटन करण्यात आला.वाचनालयाचे सचिव चंद्रकांत पोतदार यांनी वाचनालयाचे अहवाल वाचन करून ग्रामीण भागातील अ दर्जाचे सर्वसोयीने युक्त असा वाचनालय असुन २१ हजार पुस्तक , ७१ मासिके सर्व भाषिक वर्तमान पत्रे असुन शासनाचे सर्व कार्यक्रम वाचनालयात राबविले जात असल्याचे स्पष्ट केले .या वेळी सरपंच सुधीर आष्टे यांनी वाचनालयाचे कार्य अनुकरणीय व स्तुत्य असल्याचे सांगितले , श्रीशैल ठोंबरे , कल्लप्पा बिराजदार यांचे भाषणे झाले त्यानंतर ३५ गुणीजनाचे सत्कार सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.

Unlimited Reseller Hosting