Home विदर्भ हिंगणघाट तालुक्यातील डवलापुर येथील भोयर कुटुंबाला विठ्ठल पूजेचा मान

हिंगणघाट तालुक्यातील डवलापुर येथील भोयर कुटुंबाला विठ्ठल पूजेचा मान

238

पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे समस्त महाराष्ट्रीयन भक्तांसाठी आराध्य दैवत या विठ्ठलाची प्रत्यक्ष आपल्या हातून पूजा व्हावी, त्याची आराधना व्हावी हे प्रत्येक विठ्ठल भक्ताची मनापासून मनोकामना असते. ज्या दिवशी सामान्य विठ्ठल भक्ताला या पूजेचा मान मिळतो तो दिवस त्याच्या जीवनातील अमृततुल्य दिवस म्हणून त्याच्या चिरकाल स्मरणात राहतो. हा मान यावर्षी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील य विठ्ठल भक्त श्री. कडूजी भोयर व सौ कुसुमताई कडूजी या दांपत्याला प्राप्त झालेला आहे. कार्तिक एकादशीला होणाऱ्या शासकीय पूजेच्या वेळेला या दोन्ही दांपत्याला पूजेसाठी पंढरपूर येथे आमंत्रित केलेले आहे . महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्यासोबत हे दांपत्य दिनांक 26/ 11/ 2020 रोजी गुरुवार ला सकाळी पहाटे 2.00 ते 4.00 दरम्यान पंढरपूर येथे शासकीय पूजेत सहभागी होणार आहे.
श्री कडूजी भोयर हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त असून दरवर्षी वारीला जाणे, पांडुरंगाची सेवा करणे हा त्यांचा दिनक्रम आहे . या त्यांच्या सातत्याने होत असलेल्या सेवेची पावती म्हणून त्यांना हा पूजेचा मान प्राप्त झालेला आहे , त्यांची पत्नी सौ. कुसुमताई कवडूजी भोयर यांचे माहेर हिंगणघाट तालुक्यातीलच घाटसावली गावचे बिडकर घराणे हे होय या मिळालेल्या मानामुळे भोयर कुटुंब व आपल्या घरातील मुलगी प्रभू पांडुरंगाच्या पूजेमध्ये पूजेमध्ये सहभागी होणाऱ्या बातमीने बिडकर कुटुंब आनंदी झालेले आहे.* *या दाम्पत्यावर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.पुढील एक वर्ष महाराष्ट्र एसटी बससेवा त्यांना शासनामार्फत मोफत देणार आहे. या बातमीमुळे हिंगणघाट परिसरामध्ये सर्वीकडे आनंद व्यक्त होताना दिसत आहे.