Home नांदेड एम आय एम पक्षाच्या नादेंड जिल्हा सचिव म्हणून पत्रकार शेख गौस रामतीर्थकर...

एम आय एम पक्षाच्या नादेंड जिल्हा सचिव म्हणून पत्रकार शेख गौस रामतीर्थकर यांची नियुक्ती ,

156

 

सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव ,

 

नादेंड प्रतिनिधी

रामतीर्थ ता.बिलोली येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार शेख गौस चाॅदसाब रामतीर्थकर यांची आॅल ईडींया मजलीस इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टीच्या नादेंड जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली असून त्यांची निवड झाल्या मूळे अनेकांनी त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे ,

एम आय एम पक्षाचे पक्ष प्रमुख तथा खासदार बॅरीस्टर असदोद्दीन ओवेसी यांच्या आदेशानुसार मराठवाडा अध्यक्ष फेरोज खान लाला नादेंड जिल्हाध्यक्ष मीर्झा अमजद बेग यांनी शेख गौस रामतीर्थकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हा सचिवपदी नियुक्ती केली. गेल्या अनेक वर्षापासून शेख गौस रामतीर्थकर हे एम आय एम पक्षात देगलुर बिलोली विधानसभा अध्यक्ष पदावर काम पाहत होते त्यांच्या कार्याची दखल पक्षाने घेतली आणि दिवाळीच्या शुभ दिनीच मीर्झा अमजद बेग यांनी त्यांची निवड केली त्यांना दीपावलीची आगळी वेगळी भेट दिली. शेख गौस रामतीर्थकर यांची एम आय एम पक्षाच्या नादेंड जिल्हा सचिवपदी निवड झाल्याचे वृत्त समजताच अनेकांनी प्रत्यक्ष, भेटून सोशल मीडिया च्या माध्यमातून त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .यावेळी एम आय एम पक्षाचे नादेंड जिल्ह्याचे पदाधिकरी व सर्व तालुक्यातील पदाधिकरी व कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थीत होते ,