महत्वाची बातमी

दिवाळी निमित्त खास सोन्याची मिठाई बनली आकर्षण ,

दिवाळी निमित्त खास सोन्याची मिठाई बनली आकर्षण ,

 

सात हजार रुपये किलो सोन्याची मिठाई…

अमीन शाह ,

दिवाळी निमित्य अमरावतीच्या नामांकित असलेल्या रघुवीर मिठाई यांनी यावर्षी शुद्ध सोनेरी वर्क लावलेली “सोनेरी भोग” ही मिठाई बाजारात आणली आहे.. विदर्भातीलच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील ग्राहकांकरिता ‘सोनेरी भोग’ सोबत अन्य विविध प्रकारच्या मिठाई उपलब्ध करून दिल्या आहेत. पिस्ता, केसर आणि हेजलनट या ड्रायफ्रुट पासून ही मिठाई तयार करण्यात आली असून या मिठाईवर खास दिल्लीच्या नोएडा येथून मागवलेला सोन्याचा 24 कँरेट सर्टिफिकेटसह वर्ख बोलावून मिठाईवर लावलेला आहे तर राजस्थान मधील कारागिरांनी ही विशेष मिठाई तयार केली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ही सोन्याची मिठाई खरेदी करण्यासाठी व पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली आहे

➡ पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मुख्य संपादक –

➡ विनोद पञे
सा. पोलीसवाला

मो. 9325555825 / 9552951825

संपादक –

➡ अमीन शाह
पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मो. 9421471752