
रावेर (शरीफ शेख)
एरंडोल पोलिस स्टेशन मध्ये यशस्वी कार्य केलेले, आता निंभोरा येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी श्री. स्वप्निल उनवणे यांनी निंभोरा पोलिस स्टेशन चा नुकताच पदभार स्विकारला निंभोरा पोलिस स्टेशन ची धुरा सांभाळत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत जनतेत समन्वय ठेवण्याची महत्व पूर्ण भूमिका निभावणार असुन सर्व सामान्य नागरीकांमध्ये पोलिसदला विषयी आदर निर्माण करुन अप्रिय घटना रोखण्यासाठी पोलिसदलाचे कसोशिने प्रयत्न करून गुन्हेगाराला कायदVयाची भिती वाटेल अशा पद्धतीने कामकाज करणार असुन, सामाजिक, राजकीय व्यक्तित समन्वय राखणार, असे श्री. स्वप्निल उनवणे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य मराठी ग्रामीण पत्रकार रावेर तालुका संघाच्या वतीने निंभोरा पोलिस ठाण्यात मा. श्री स्वप्निल जी उनवणे , पोलीस निरीक्षक साहेब यांचे स्वागत पुष्प देऊन करण्यात आले, स्वागत करते वेळी तालुकाध्यक्ष श्री विलास ताठे, तालुका संघटक श्री प्रदीप महाराज, सदस्य श्री प्रमोद कोंडे, विनायक जहूरे , प्रभाकर महाजन,आदि मान्यवर उपस्थित होते.













































