Home जळगाव गलवाडे रस्त्यावरील पेट्रोल पंपाच्या टाकीतून २ हजार लीटर डिझेल लंपास… अज्ञात चोरट्याविरुद्ध...

गलवाडे रस्त्यावरील पेट्रोल पंपाच्या टाकीतून २ हजार लीटर डिझेल लंपास… अज्ञात चोरट्याविरुद्ध मारवड पोलिसात तक्रार दाखल…

58
0

रजनीकांत पाटील

अमळनेर  – तालुक्यातील गलवाडे रस्त्यावरील साई पेट्रोल पंपाच्या टाकीतून अज्ञात चोरट्याने दोन हजार लिटर डिझेल लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी धनंजय बडगुजर यांच्या मालकीचा गलवाडे रस्त्यावर साई पेट्रोल पंप आहे. दि. ८ रोजी सकाळी ११:४५ वाजता मॅनेजर आशिष साळुंखे, कामगार सतीश बागुल, प्रदीप पाटील यांनी डिझेल टाकीत डिझेल चेक केले असता सदर टाकीत २ हजार लिटर डिझेल लंपास आल्याचे समजून आले. तसेच टाकीचे झाकण कापून फेकून दिल्याने आढळले. यानंतर मालक बडगुजर यांनी खात्री केली असता एक लाख साठ हजार रुपये किमतीचे दोन हजार लिटर डिझेल दि. ७ रोजी रात्री ११:५५ ते दि. ८ रोजी सकाळी ११:४५ वाजेच्या दरम्यान चोरीस गेल्याचे आढळून आले.त्यामुळे मारवड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स. पो. नि. राहुल फुला यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. रोहिदास जाधव, भास्कर चव्हाण व सचिन निकम हे करीत आहेत.