Home विदर्भ संत रामराव महाराज यांना घाटंजी व दारव्हा तालुक्यातुन श्रद्धांजली अर्पण

संत रामराव महाराज यांना घाटंजी व दारव्हा तालुक्यातुन श्रद्धांजली अर्पण

101

यवतमाळ – दारव्हा व घाटंजी तालुक्यातील शिवणी, घाटूंबा, माऊली, येथील बंजारा समाज व राष्ट्रीय बंजारा परिषद यांचे कडून बंजारा शक्ती पिठाधिश, महान तपस्वी, ब्रम्हचार्य संत डॉ.रामराव महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी संत सेवालाल महाराज, ब्रम्हचारी डॉ रामराव महाराज यांच्या महान जिवन चारित्र्यावर त्यांच्या तत्वज्ञानावर मार्गदर्शन करण्यात आले,

राष्ट्रीय बंजारा परिषदेचे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष मोहन जाधव यांनी सांगितले की संत रामराव महाराज यांनी संपूर्ण भारत देश भ्रमन करून विखुरलेल्या १२ करोड बंजारा समाजला एकत्र आनण्यासाठी बंजारा बहुल राज्य तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्णाटक, गुजरात, महाराष्ट्र या राज्यामधे जावून तेथे राहणार्या एक-भाषा, एक-बोली, एक-संस्कृती, एकच-वेषभूषा असलेल्या बंजारा समाज बांधवांना एका झेंड्याखाली आणण्याचे महाण कार्य बापूंनी केले, सर्वांना एका झेंड्याखाली राहण्याचे उपदेश बापूंनी दिले, पोहरागड हेच आपल्या बंजारांची काशी असून बंजारा समाजाचे शक्तीपिठ आहेत, संत सेवालाल महाराजाचे महान तत्वज्ञान पोहरागड येथूनच बंजारा समाज जिवणावर रूजविण्याचे महान कार्य संत रामराव बापूंनी केले, समाजात व देशात पुन्हा असे संत होणेच नाही, असे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले, तर डॉ. सुरेश पवार व ग्रामस्थानी श्रद्धांजली अर्पण करून संत रामराव महाराज अमर रहे!! घोषणा देवून सर्वांना कडाव प्रसाद देवून कार्यक्रमाचे समारोप केले.