
रावेर (शरीफ शेख)
रावेर तालुक्यात दि 6 नोव्हेंबर रोजी संध्याकाळ च्या सुमारास आदिवासी विकास विभाग चे मंत्री महोदय मा,ना,क्ष्री,के.सी.पाडवी यांना रावेर येथुन आदिवासी एकता मंच तर्फे आदिवासी एकता मंच चे जिल्हा अध्यक्ष सलीम तडवी,राज्य सदस्य नसीर तडवी,सरफराज तडवी,तर महिला जिल्हा अध्यक्ष, हसीना तडवी,बबिता तडवी,लुकमान तडवी,तालुका अध्यक्ष नबाब तडवी,आणि सहसचिव जहांगीर तडवी,समीर तडवी यांसह अनेक कार्यकर्ते हजर होते,त्याचबरोबर आदिवासी विकास विभाग मंत्री ,के.सी.पाडवी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,पेसा क्षेत्रातील आदिवासी गावांमधे शबरी घरकुल योजना ही टार्गेट वाढवुन विशेष पँकेज देण्यात यावे,पेसा क्षेत्रांतील गावांमंधे जे गाव जोडरस्ते आहेत,त्यांना देखील निधी उपलब्ध करुन द्यावा ,तसेच आदिवासी बांधवांचे रेशनकार्ड विभक्त करुन मिळावे. असे निवदनात म्हटले आहे. आदिवासी एकता मंच कडुन आदिवासी विकास विभाग मंत्री ,मा,ना,क्ष्री,के.सी.पाडवी यांना योजनांबाबतीत निवेदन देतांना आदिवासी एकता मंचे चे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.











































