Home बुलडाणा विचित्र अपघातात आजी आजोबा सह नातू ठार ,

विचित्र अपघातात आजी आजोबा सह नातू ठार ,

304
0

एका वाहनाने उडवले तर दुसऱ्या वाहनाने चिरडले.

डोणगाव जवळील घटना तिन्ही मृतक जागेवरच गतप्राण.

जमीर शाह ,

अकोला जिल्हातील पातूर येथून बुलढाणा जिल्हातील साखर खेर्डा येथील आपल्या मुलीच्या घरी ते जात होते.
डोणगांव जवळ मेहकर कडे जातांना नागपूर जवळील कलामध्ये 3 वाजता दरम्यान पातूर वरून सा खेर्डा येथे मुलीच्या भेटी साठी जाणाऱ्या एम ए टी मोटार सायकल वरून जाणारे वृद्ध दांपत्य व त्यांच्या नातुला एका टँकरने उडवले तर समोरून येणाऱ्या आईशर या वाहनाने चिरडले या घटनेत तिघांचे जागेवरच मृत्यू झाला व मोटारसायकलचा चुराडा झाला व दोन्ही वाहने रस्त्यावरून खाली उतरल्याची घटना १ नव्हेंबर रोजी घडली.
औरंगाबाद नागपूर राज्य महामार्गावर डोणगाव पासून जवळच असलेल्या कला मध्ये १ नव्हेंबर च्या दुपारी ३ वाजता दरम्यान अकोला जिल्हातील पातूर वरून अब्दुल जब्बार अब्दुल रज्जाक वय ६५ वर्ष व त्यांची पत्नी जमीला बी अब्दुल रज्जाक वय ५८ वर्ष आणि नातू म.हाशिम वय १२ वर्ष सर्व राहणार सळणी पुरा पातूर एम ए ती क्रमांक Mh34 BG 6841 ने बुलढाणा जिल्हातील सा खेर्डा येथे मुलीच्या भेटी साठी चालले असता डोणगाव पासून जवळच मेहकर कडे जातांना कला मध्ये मेहकर कडून येणाऱ्या टँकर ने एम ए टी स्वरास धडक दिली तर मागून मालेगाव कडून येणाऱ्या आयशर Mh04 Jk 9387 ने तिघांना चिरडले यात आजी आजोबासह नातू जागेवरच मृत झाले अपघात इतका गंभीर होता की तिन्ही मृतकाचे मृतदेह छिन्न विच्छिन्न झाले होते तर मोटारसायकल सुद्धा चुराडा झाली आणि दोन्ही वाहन रोडच्या खाली गेले यात टँकर चालकाला बघगणाऱ्यांनी प्रसाद दिला आणि दोन्ही वाहनाचे चालक व वाहक सुखरूप आहेत .(डोणगाव पोलिसांनी अपघात स्थळी जाऊन वाहतूक नियंत्रित केली व मृतका सोबत असलेल्या सामानाची पाहणी केली असता त्यात शहादा बानू अब्दुल रज्जाक राहणार पातूर हा शाळा सोडण्याचा दाखला मिळाला त्यावरून मृतकाची ओळख पटली )
पातूर येथे माहिती मिळताच शोककळा पसरली हा परिवार खूप गरीब असून मृतक अब्दुल जब्बार या वयात सुद्धा मोल मजुरी करून आपल्या परिवारास हातभार लावत होते या दाम्पत्याची मुलीच्या घरी जाण्याची शेवटची इच्छा अपुरीच राहिली,

ऐककुलता हॊता म , हाशिम ,

या अपघातात मृत्यू झालेले अब्दुल जबार यांचा नातू म , हाशिम याला चार बहिणी आहेत ती चार बहिणी चा एककुलता भाऊ होता झालेल्या या अपघाता मूळे साखरखेर्डा व पातूर येथे शोककळा पसरली आहे ,

Previous articleविचित्र अपघातात आजी आजोबा सह नातू ठार ,
Next articleसौभाग्य योजनेचे यवतमाळात तीन-तेरा
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.