Home विदर्भ यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची तक्रार आरोग्य विभागाने केली ,  “उलट जिल्हातीलचं जनता जिल्हाधिकारी साहेबांच्या...

यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची तक्रार आरोग्य विभागाने केली ,  “उलट जिल्हातीलचं जनता जिल्हाधिकारी साहेबांच्या मदतीला धावुन आली….!”

784

कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी का झाले आरोग्य विभागाला डोईजड ??

नरेन्द्र कोवे

यवतमाळ – जगभरात करोना विषाणूजन्य साथीने प्रचंड प्रमाणात थैमान घातले आहे. या साथीमुळे जगातील बलशाली सत्ता देखील हतबल झालेल्या दिसत आहे. करोना विषाणूमुळे आलेल्या आरोग्य आणीबाणीमुळे जिल्हातील वेगवेगळ्या समाजामध्ये आजार आणि मृत्यू बरोबरच भीतीचाही शिरकाव होत आहे. करोनाच्या या संकटकाळात भीती मानवता आणि माणुसकी यांचा पराभव करतांना दिसत आहे. या साथीच्या वाढत्या प्रसारामुळे फक्त मानवी समूहाला ” जिवंत राहणे ” हीच आपली प्राथमिकता आहे, हे अधोरेखित करायला आज भाग पाडले आहे
आपण आपल्याच माणसाच्या मदतीला धावुन जात नसतांना मात्र यवतमाळचे जिल्हाधिकारी साहेब जिल्हातील करोना मुक्तीसाठी खऱ्या अर्थाने लढा देत आहे. आरोग्य विभागाने मात्र दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी साहेबांचीच तक्रार केल्याने यवतमाळ जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच नोंद झाली आहे.
जिल्हातील जनतेला नागरी सुखसुविधा प्रदान करण्यासाठी शपथ घेतलेल्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आरोग्य विभागाला डोईजड झाले असले तरी या संघर्षातुन सामाजिक स्वास्थाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शिस्तप्रिय व प्रामाणिक यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी करोनाच्या काळात जनतेला वैधकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्याकडून शिस्त आणि नियमांची काटेकोरपणे अमलबजावणी व्हावी जेणेकरून करोना काळात रुग्णांची साखळी वाढणार नाहीत याकरीता वैधकीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. आणि संपुर्ण जिल्हातील वैधकीय सुविधा कार्यान्वित केली होती. परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे जिल्हातील वैधकीय अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा आणि गोरख धंद्याला जिल्हाधिकारी ह्यांच्या कडून चपराक बसल्यामुळे जिल्हातील वैधकीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात सामूहिक राजीनामा देत जिल्हाधिकारी सिंह यांच्या बदलीची मांगणी केली आहे.
जवळपास 135 वैधकीय अधिकारी राजीनामे देणार असल्याचे समजते.
उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी’हम साथ-साथ है ‘हा ‘पिश्चर’ तयार केला असल्याचे बोलल्या जात आहे.
जिल्हातील आजही दवाखाने ओस पडलेले आहे. बऱ्याच ठिकाणी वैधकीय अधिकारी मुख्यालयी हजर राहत नसल्याने करोनामुळे मानवी जीवनमान व समाजाला अतिशय प्रभावीपणे त्रास होत आहे.
तहसील, पंचायत समिती अंतर्गत मिळणाऱ्या लाभांच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याचे चित्र आहे.
जनतेच्या मतावर राज्य करणाऱ्या लोकप्रतिनिधी मध्ये वैधकीय सेवा सुरळीत करण्याची कुवत नसल्याने त्यांची संवेदनशीलता बधिर होवुन बसली आहे. करोना विषाणूमुळे जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित झाला असतांना अजूनपर्यंत एकही लोकप्रतिनिधी जनतेच्या हिताकरिता रस्त्यावर उतरलेला दिसुन आला नाही. सामाजिक भान विसरलेल्या लोकप्रतिनिधी विषयी जनमत नाराज होऊन आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

व्हायरल व्हिडिओने जिल्हाधिकारी साहेबांचे पारडे जड, जनतेचा वाढता प्रतिसाद…

करोना विषाणूची मानवी साखळी तोडून जनतेला वैधकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात या उदांत हेतूने अवश्यकत्या सूचना वैधकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. सूचना पाळण्याऐवजी त्यांनी सामूहिक राजीनामे देत जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या बदलीची मागणी लावून धरली परिणामी कोविड सेंटर प्रभावित होऊन जनतेला बराच मनस्ताप सहन करावा लागला.
परंतु जिल्हाधिकारी ह्यांनी घेतलेला हा निर्णय जनहितार्थ होता, हे आता जनतेला हळू-हळू कळू लागले आहे.
राळेगाव तालुक्यातील वाढोना बाजार येथील सामाजिक कार्यकर्ते नईम शेख ह्यांनी जिल्हाधिकारी साहेबांच्या समर्थनार्थ व्हिडीओ तयार करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर व्हिडीओ हा जिल्हात बराच व्हायरल होत असल्यामुळे जनतेचा जिल्हाधिकारी यांना वाढता प्रतिसाद मिळू लागला आहे.
सामाजिक जाण आणि भान असलेल्या बऱ्याच युवा कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या समर्थणार्थ प्रतिसाद देऊ लागले आहे.
जिल्हातील ग्राम पंचायत मधून जिल्हाधिकारी यांच्या समर्थनार्थ ठराव येऊ लागले आहे, अशी माहिती नईम शेख ह्यांनी दिली आहे. त्यामुळे वैधकीय अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात जनतेचा रोष वाढणार , अशी भीतीही नईम शेख ह्यांनी व्यक्त केली आहे.