Home मराठवाडा राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

227
0

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी,तथा राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक बालकिशन उर्फ बाबुशेठ लोया यांचे आज १६ आॅक्टोंबर, शुक्रवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले.त्यांचे वय ८० वर्षे होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,मुली,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अंतीम संस्कार करण्यात येणार आहेत.

हे पण वाचा

दीवंगत बालकिशन उर्फ बाबुशेठ लोया हे सामाजिक, राजकीय क्षेत्रातील विविध आघाड्यांवर अग्रेसर राहिले,सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या कुंभार पिंपळगाव येथील शाखेत अध्यक्ष पदावर असताना शाळेचा कायापालट घडवून आणला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार,दीवंगत अंकुशराव टोपे, पालकमंत्री राजेश टोपे यांच्या विचारांशी आणि तत्त्वांशी एकनिष्ठ राहिले.संयमशील आणि
मृदूभाषीक स्वभावामुळे ते सर्वांना हवेहवेसे वाटायचे.बालकिशन लोया यांच्या निधनाने एक सच्चा ग्रामिण पुढारी हरवला असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर लोया, प्रतिष्ठीत व्यापारी ओमप्रकाश लोया यांचे ते वडील होत.