Home विदर्भ यवतमाळ जिल्हातील पारवा ठाणेदाराकडून आदिवासी इसमाला जातीवाचक शिवा देत मारहाण

यवतमाळ जिल्हातील पारवा ठाणेदाराकडून आदिवासी इसमाला जातीवाचक शिवा देत मारहाण

455
0

ठाणेदाऱ्यांच्या विरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल

यवतमाळ / घाटंजी – तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोरख चौधर यांनी कुर्ली येथील रहिवासी अशोक यशवंत आत्राम यांना जातीवाचक शिवीगाळ करून लाथा बुक्काने मारहाण केल्याबाबदतची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर करण्यात आली आहे. तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे दिनांक 6/10/2020 ला तक्रारकर्त्यांच्या घरी बीट जमादार लखन राठोड आले व त्यांनी ठाणेदार यांनी उद्या पो. स्टे. पारवा ला बोलविले म्हणून सांगून गेले. त्यानंतर दिनांक 7/10/2020 रोजी ठीक सकाळी 10:30 वाजता तक्रारकर्ता गेले असता तेथे त्यांना निरर्थक बसवून ठेवले व नंतर दुपारी 3:45 वाजता ठाणेदार यांनी त्यांना बोलविले व जातीवाचक शिवीगाळ करीत तसेच मारहाण करून केली. तसेच त्यानंतर तक्राकर्त्यांनी बीट जामदार याना मला मारहाण का करण्यात आली असे विचारले असता त्यांनीही तक्राकर्त्याना मारहाण मारहाण केली.
ठाणेदार हे अरेरावी प्रवृत्तीचे असून त्यांनी मला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करून माझा अपमान केला. त्यामुळे त्यांच्यावर भा. द. वि. तसेच अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात यावी. सदर पोलीस स्टेशन हे आदिवासी भागात असून अनेक लोकांवर अन्याय होत असतो. परंतु गैरअर्जदार हे समजावून न सांगता अरेरावीची भाषा करून माझ्या साद्या आदिवासी व्यक्तीला अपमानित करून मारण्याचे काम करतात आणि म्हणून माझ्यामध्ये व परिसरातील संपूर्ण आदिवासी लोकांमध्ये ठाणेदाराबाबत भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्वरित सदर घटनेची चौकशी करून गैरअर्जदार कठोर कार्यवाही करण्यात यावी व मला न्याय मिळवून कठोर कारवाई करण्यात यावी व मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे.
यापूर्वीही परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांनी त्यांच्या अरेरावी व नागरिकानप्रती असभ्य वागणुकी विषयी पारवा ठाणेदार यांच्याविषयी विवध तक्रार करण्यात आली आहेत.