Home जळगाव हिंगोणा ता यावल येथे आदिवासी एकता मंच च्या द्वितीय शाखेचे उद्घाटन

हिंगोणा ता यावल येथे आदिवासी एकता मंच च्या द्वितीय शाखेचे उद्घाटन

53
0

रावेर (शरीफ शेख) 

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील हिंगोणा या गावी आदिवासी एकता मंच चे द्वितीय शाखेचे उद्घाटन करण्यात आले,यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हाध्यक्ष सलीम तडवी यांच्या उपस्थितीत,राज्य सदस्य नासीर तडवी यांचे हस्ते हिंगोणा येथे आदिवासी एकता मंच च्या द्वितीय शाखेचे उद्घाटन करण्यात आले,या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कमीत कमी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा शाखा उद्घाटन सोहळा पार पडला.तसेच समाजासाठी,गरीब जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी , आणि समाजासाठी संघर्ष करणाऱ्या तरुणांनी आदिवासी एकता मंच मधे सामिल व्हावे व समाज संघटित करावा,एकोप्याची भावना निर्माण व्हावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सलीम तडवी यांनी केले.या कार्यक्रमात जिल्हा कार्याध्यक्ष फिरोज अब्बास (बिबड्या)तालुका अध्यक्ष सरदार बलदार तडवी यांनी विशेष परिश्रम घेतले,शाखा अध्यक्ष रहीम कालु तडवी,,उपाध्यक्ष बिसमिल्ला कालु,सचिव इरफान तडवी,हमीद ड्रायव्हर व उपस्थित सर्व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.