
नांदेड ( प्रशांत बारादे) :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या तर्फ घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक (इ.५वी ) व पूर्व माध्यमिक ( इ.८वी) शिष्यवृत्ती परीक्षेत कच्छवेज् गुरुकुल स्कुल चे ७ विधार्थी पाञ ठरले आहेत .यशस्वी विधार्थामध्ये इ.५ वी मधुन श्रीनिवास सूर्यवंशी व इ.८वी मधुन अक्षत कच्छवे,अंजली गोरे ,नेहा पाटिल ,विनायक मोरे , आदित्य भारती व श्रद्धा वैदय हे विधार्थी व विधार्थीनी पाञ ठरले आहेत .यशस्वी विधार्थाचे अभिनंदन शाळेचे संचालक तथा जिल्हा समुपदेशक मा. बालासाहेब कच्छवे ,संस्थेचे सचिव आदित्य कच्छवे ,मुख्याध्यापिका सौ .दुर्गादेवी सोरेकर,सचिन वसरणीकर व प्रशांत बारादे व शिक्षकवृदांनी अभिनंदन केले.











































