Home जळगाव नुरुद्दीन मुल्लाजी यांना महात्मा गांधी पीस मेसेंजर अवार्ड तथा महात्मा गांधी ग्लोबल...

नुरुद्दीन मुल्लाजी यांना महात्मा गांधी पीस मेसेंजर अवार्ड तथा महात्मा गांधी ग्लोबल अवार्ड मिळाल्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचा सत्कार

135

रावेर (शरीफ शेख) 

जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथील समाज सेवक तथा पत्रकार नूरुद्दीन मुल्लाजी यांना भुनेश्वर ओडिसा संस्थेतर्फे पीस मेसेंजर अवार्ड तसेच गुजरात येथील संस्था तर्फे महात्मा गांधी ग्लोबल अवार्ड 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधून त्यांना दोन्ही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल. येथील मौलाना आझाद विचार मंचातर्फे मौलाना आझाद विचार मंचचे अध्यक्ष अन्वर भाई मिस्तरी,
त्रिशक्ती ग्रुप तर्फे प्राध्यापक प्रतापराव पवार ,प्रजा न्यूज महाराष्ट्र तर्फे संपादक प्रतिक जाधव ,आर पी आय आठवले गट तर्फे प्रवीण भाऊ बाविस्कर यांनी त्यांचा सत्कार केला,
प्रविन बाविस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचाही सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा येथील तालुका गाव माझा न्यूज चे संपादक बंडू भाऊ सोनार उप संपादक शेख जावेद उपस्थित होते प्रवीण भाऊ बाविस्कर प्राध्यापक प्रतापराव पवार व नुरुद्दीन मुल्लाजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी अब्दुल सत्तार जनाब मन्सूर खा पठाण ,किशोर चौधरी, मोहसिन अली, नूर खान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.