Home विदर्भ शेंदोळा खुर्द गावाला ‘स्मार्ट ग्राम’मध्ये १० लाखांचा पुरस्कार , विकासप्रक्रियेत महिलांचे मोठे...

शेंदोळा खुर्द गावाला ‘स्मार्ट ग्राम’मध्ये १० लाखांचा पुरस्कार , विकासप्रक्रियेत महिलांचे मोठे योगदान पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

106

कोरोना लढवय्यांचा सन्मान…!

तालुक्यातील पीएचसीना पीपीई किट….!!

( मनिष गुडधे पाेलीसवाला प्रतिनीधी )
अमरावती, दि. ६ : महिला ही कुटुंबाचा व पर्यायाने समाजाचाही आधार असते. विकासप्रक्रियेत महिलांचे योगदान मोठे आहे, असे प्रतिपादन असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी तिवसा येथे केले.
तिवसा तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात
जीवनोन्नती अभियानात निवड झालेल्या विविध महिला बचत गटांना, तसेच स्मार्ट ग्राम म्हणून निवड झालेल्या शेंदोळा खुर्द ग्रामपंचायतीला पुरस्कार पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते देण्यात आला. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांना चेक वाटप तसेच कोविड-१९ काळामध्ये काम करीत असलेल्या कोरोना योध्दा यांना प्रमाणपत्र वाटप तसेच दुर्गवाडा येथील निम्न वर्धा पुनर्वसितांना धनादेशाचे वाटपही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते यावेळी झाले. यशोमती ठाकूर मित्र मंडळातर्फे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना
पीपीई किटचे वितरणही यावेळी करण्यात आले. जि. प. सभापती पूजाताई आमले,तिवसा येथील नगराध्यक्ष वैभव वानखडे, शिल्पाताई हांडे, उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, तहसीलदार वैभव फरतारे, गट विकास अधिकारी चेतन जाधव, मुख्याधिकारी पल्लवी सोटे, तालुका आरोग्य अधिकारी ज्योत्स्ना पोटपीटे आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की,कोरोना संकटकाळात प्रवासी नागरिकांसाठी व्यवस्था उभी करताना तिवसा तालुक्यातील नागरिकांनी, संस्थांनी भरभरून मदत केली. त्यामुळे प्रवासी नागरिकांना शेल्टर होम व इतरही बाबींसाठी मोठी मदत झाली. शासनाच्या हाकेला धावून आलेली ही सगळी मंडळी खऱ्या
अर्थाने कोविड योद्धा आहेत. संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री संदेशातील रोकडा धर्म आपण पाळलेला आहे. संत महात्माच्या या भूमीतील आपण कृतीशील वारसदार आहात. कोरोनाची साथ अजूनही संपलेली नाही.कोरोनावर मात करण्यासाठी आपल्या सर्वानाच जीवनशैलीत दक्षता सूत्रीचा समावेश करावा लागेल, असे आवाहनही त्यांनी केले.

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचा निधी यापुढेही नियमित मिळण्यासाठी कार्यवाही व्हावी, असे निर्देशही त्यांनी दिले. कोरोना संकटकाळात पूर्व भारतातील व इतरही ठिकाणच्या प्रवासी नागरिकांसाठी भोजन, निवास, उपचार आदी सुविधा तिवसा तालुक्यातील नागरिकांनी मोठी मदत केली, असे श्री. फरतारे यांनी प्रास्ताविकात सांगितले.