Home मराठवाडा मराठवाडा विभागात,अंबड-घनसावंगीत तीन साखर कारखाने

मराठवाडा विभागात,अंबड-घनसावंगीत तीन साखर कारखाने

451

महंत डॉ.श्रीकृष्ण पुरी महाराज यांच्या हस्ते समृद्धी साखर कारखान्याचा बॉयलर पेटला…!

घनसावंगी– लक्ष्मण बिलोरे

मराठवाडा विभागातील जालना जिल्ह्याच्या अंबड- घनसावंगी तालुक्यात ऊसाचे मोठे क्षेत्र असून या तालुक्यांत तीन साखर कारखाने आहेत आज उक्कडगाव संस्थानचे मठाधिपती महंत डॉ. श्रीकृष्ण पुरी महाराज यांच्या हस्ते बाॅयलर पेटविण्यात आले. कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून समृद्धीचा बाॅयलर प्रदीपन कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला.या प्रसंगी ” समृद्धी’ चे चेअरमन सतीष घाडगे म्हणाले कि, गेली दहा वर्षे ज्या शेतकऱ्यांनी समृद्धी वर विश्वास ठेवला,त्या शेतकऱ्यांना ऊस लागवड करण्यासाठी परवानगी देण्यात येवून नोंदी घेण्यात येतील.दोन वर्षांपासून समाधान कारक पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचा ऊस लागवड करण्यावर भर दिला, त्यामुळे साहजिकच ऊस लागवड क्षेत्र
वाढलेले आहे.मागील हंगामात समृद्धी कारखान्याने २ लाख,२० हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले.शेतकऱ्यांना प्रतिटन २हजार५०० भाव दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रसंगी, कारखान्याचे व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी, वैशालीताई घाडगे,संचालक दिलीप फलके, शिवराज नखाते, बाळासाहेब कोल्हे, अभिजित उढाण, रणजित उढाण, विकास शिंदे,राहुल नखाते यांच्यासह , ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व कारखान्याचे व्यवस्थापक माथनकर, मुख्य शेतकी अधिकारी आमोल तौर, पर्चेस ऑफिसर ,प्रदिप घाडगे, डेप्युटी चीफ ई. सिंग,चिफ केमिस्ट माथुर यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.