Home जळगाव MGGP फाऊंडेशन भुवनेश्वर ओडिसाच्या वतीने नुरोद्दीन मुल्लाजी यांना Peace messenger award ने...

MGGP फाऊंडेशन भुवनेश्वर ओडिसाच्या वतीने नुरोद्दीन मुल्लाजी यांना Peace messenger award ने सन्मानित

105
0

रावेर (शरीफ शेख) 

जळगाव जिल्ह्यातील कासोदा तालुका एरंडोल
येथील मौलाना आझाद विचार मंचचे जिल्हा संघटक , त्रिशक्ती ग्रुप महाराष्ट्राचे जिल्हा अध्यक्ष , समाजरत्न पुरस्कृत श्री नूरुद्दीन मुल्लाजी यांना 02 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्ताचे औचित्य साधून त्यांना महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन भुवनेश्वर ओडीसाच्या वतीने महात्मा गांधी ग्लोबल पीस अवार्ड 2020 तसेच
गुजराथ येथील के,जी,एन ह्यूमीनिटी सामाजिक संस्थे च्या वतीने महात्मा गांधी पीस अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
दोन्ही पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले . हे पुरस्कार म्हणजे त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची ही पावतीच आहे . दुःखी-पीडितांचे दुःख दूर करण्यासाठी नेहमी झटत असतात .शासन दरबारी त्यांचा पाठ पुरावा करून विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यास नेहमी अग्रेसर असतात . त्यांचे हेच सेवाभावी कार्य अनेक संस्थांना पुरस्कार देण्यासाठी उत्तेजित करतात .आशा महत्वपूर्ण पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड झाल्याने सदरच्या दोन्ही संस्थांना गावकऱ्यांनी धन्यवाद दिले. गावतील प्रतिष्ठित मंडळी व नागरिकांनी नुरोद्दीन मुल्लाजी यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले. त्यांना मिळालेल्या या दोन्ही पुरस्काने कासोदा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला , अशा प्रतिक्रिया यावेळी उमटल्या.