Home मुंबई रिपाई डेमोक्रॅटिक, पत्रकारांच्या सुरक्षा, गृहनिर्माण, मानधन,पोर्टल व यु-ट्यूब चॅनेलच्या नोंदणी साठी सरकार...

रिपाई डेमोक्रॅटिक, पत्रकारांच्या सुरक्षा, गृहनिर्माण, मानधन,पोर्टल व यु-ट्यूब चॅनेलच्या नोंदणी साठी सरकार दरबारी प्रश्न मांडणार – पँथर डॉ माकणीकर

166

मुंबई , दि. १९ –  (प्रतिनिधी) लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ, शोध पत्रकारीता आणि सत्य प्रकट करतांना त्यांच्या जीवावर बेतते कधीकाळी मालक चालक पत्रकाराला योग्य सुरक्षा पुरवू शकत नाहीत व पत्रकारिता पंगू होते अश्या निर्भीड पत्रकारांच्या मागे आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष सक्षमपणे उभा राहून त्यांच्या मूलभूत प्रश्नावर आवाज उठवणार असल्याची माहिती केंद्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना दिली.

पत्रकारिता छंद किंवा आवड म्हणून काम न करता जवाबदारी म्हणून काम करणाऱ्यांची संख्या कमी जास्त प्रमाणात असली तरी प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मेडिया कुण्या तरी धनदांडग्यांच्या दावणीला बांधलेली दिसत आहे.
युवा वर्गांनी व जवाबदार पत्रकारांनी सोसिएल मीडिया चा फायदा घेऊन पोर्टल तर यु-ट्यूब चॅनेल्स उभारले आहे. सोसिएल मीडिया च्या वतीने यांना जाहिरातीवर मुबलक पैसे मिळतात तर काहींना वर्षो ना वर्ष काहीच हातात मिळत नाही. विडिओ एडिटिंग तर पोर्टल रेनिवल चा खर्च मधेच उभारतो. अश्यावेळी पत्रकारिता संशयास्पद होऊन हळू हळू गुलामीकडे जाऊ लागते, घर खर्च व जवाबदरीने ग्रासून गेलेला पत्रकार जाहिरातीसाठी राजकीय लोकांकडे अपेक्षेने पाहतो यावेळी पत्रकारिता गहाण राहणार नाही याची शंका येते.
स्वतंत्र गृहनिर्माण, मूलभूत गरजा व मानधन तसेच पोर्टल व यु-ट्यूब चॅनेल्स ची नोंदणी करून सरकारी मान्यता देऊन प्रवाहात आणण्यासाठी लवकरच युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वात राज्य महासचिव श्रावण गायकवाड, दक्षिण भारतीय सेल प्रमुख राजेश पिल्ले, बंजारा सेल राज्य प्रमुख शिवाभाई राठोड यांच्या सह एक शिष्टमंडळ सूचना व प्रसारण मंत्रालयाला भेट देऊन पत्रकारांच्या समस्या सरकारी बँकांकडून कर्जपुरवठा, शाळेत मुलांना सवलत, आदी व अन्य प्रश्नावर चर्चा करून मागण्या मान्य करवून घेणार असल्याचे डॉ माकनिकर यांनी सांगितले. गृहनिर्माणसाठी नामदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी बातचीत झाली असून राज्यातील प्रस्ताव लवकरच सादर करण्यात येणार असून थकीत व अपूर्ण प्रस्ताव डेमोक्रॅटिक कार्यलयात राज्य सचिव श्रावण गायाकवाड यांच्याशी संपर्क करून जमा करावेत अस पक्षातफे सांगण्यात आले आहे.
मागण्या मान्य न झाल्यास देशभर व्यापक आंदोलन उभा करनार असल्याचेही डॉ माकणीकर यांनी सांगितले आहे.