Home मुंबई मराठा समाजाला कायमस्वरुपी आरक्षण द्या – राष्ट्रीय स्वराज्य सेना

मराठा समाजाला कायमस्वरुपी आरक्षण द्या – राष्ट्रीय स्वराज्य सेना

284

 मुंबई – सर्वच्य न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षणात व नोकरी मध्ये महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आरक्षणास स्थगिती दिल्याकारणाने मराठा समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे . तरी आम्ही आपणास व आपल्या मार्फत महाराष्ट्र सरकारला निवेदन देत आहे की त्वरीत मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकारचा विशेष हक्काचा वापर करून व सुप्रीम कोर्ट मध्ये चांगल्या वकीलाची नियुक्ती करून मराठा समाजाला न्याय द्यावा या मागणीसाठी राष्ट्रीय स्वराज्य सेना यांच्या कडून मा. पोलीस आयुक्त , मुंबई यांना ‌निवेदन देण्यात‌ आले. तसेच मराठा समाजाला कायम स्वरुपी टिकणारे आरक्षण महाविकास आघाडी सरकारने द्यावे ही विनंती निवेदनाच्या माध्यमातुन केली असुन राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी घ्यावी असा ईशारा ‌देखिल देण्यात आला.