Home जळगाव निष्काळजीपणा,उत्तरदायीत्व चा अभाव व भोंगळ कारभार परंतु शेवटी नुकसान रुग्णाचे – कोरोना...

निष्काळजीपणा,उत्तरदायीत्व चा अभाव व भोंगळ कारभार परंतु शेवटी नुकसान रुग्णाचे – कोरोना रुग्ण बाबत कोविंड केअर युनिट चे फारुक शेख यांची नाराजी

80
0

रावेर (शरीफ शेख) 

शासकीय त्रुटी, समन्वयाचा अभाव, नियमांचे पालन न करणे, आपल्या कार्यात निष्काळजीपणा तसेच कोणासही उत्तरदायित्व नसल्याने व योग्य तो जबाबदार प्रशासकीय डाक्टर अधिकारी नसल्याने डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल येथे हे कोरोना पोसिटीव वा निगेटिव्ह रुग्ण बाबत सातत्याने काहीतरी भोंगळ कारभार उघडकीस येत आहे असे मत जळगाव कोविड केअर युनिटचे जनसंपर्क प्रमुख फारुक शेख यांनी एका पत्रकाद्वारे व्यक्त केले.

फारुक शेख यांनी पुढे म्हटले आहे की डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात पिंपराला येथील नोमान शेख हरीश हा पाच वर्षाचा बालक ताप व कन्वर्जन, झटके मुळे दिनांक १ सप्टेंबर पासून बाल रोग तज्ञ विभागात ऍडमिट होता व त्याच्यावर महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत अत्यंत चांगले उपचार सुरु होते.

डॉक्टर यांना संशय म्हणून ससपेकंटेड वार्डात दाखल

१ते १० सप्टेंबर त्यावर उपचार सुरू होते व्हेंटिलेटर निघाले होते,ओ टू लागले होते डॉक्टरांना कॉविड चा संशय आला म्हणून खालच्या वार्डात जो ससपेकटेड वार्ड आहे तेथे पाठून स्वायब घेतले दोन दिवसात अहवाल निगेटिव्ह आला या दोन दिवसाचे औषधोपचार सुद्धा बाळ कक्षातूनच सुरू होते. बाळ निगेटिव्ह आला म्हणून वरती पाठविले असता बाळ हा सस्पेक्टेड वार्डात राहिला होता त्यामुळे त्याचा परिणाम इतर बाळांवर होऊ नये म्हणून बाळ विभागाने त्यास पुनश्च वार्डात घेतले नाही व परत पाठवून दिले.

बाळ कक्ष विभागातच का स्वायब घेण्यात आले नाही

डॉक्टरांना शंका आली होती तर त्यांनी ज्या ठिकाणी बाळ बारा दिवसांपासून ऍडमिट आहे त्याच वार्डात स्वब कलेक्ट केले असते व तपासणीला पाठवले असते जेणेकरून अहवाल आल्यावर त्या मुलाचा जीव धोक्यात आला नसता ही बाब आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना प्रत्यक्ष भेटून फारुक शेख यांनी निदर्शनास आणून दिले असता त्यांनी ही तेथील व्यवस्थापनाची चूक असल्याचे कबूल केले.

चिरायु हॉस्पिटल ने ऍडमिट करून १० तासात का काढले
पाच वर्षीय बालकाला घेऊन पालक १३ सप्टेंबर रोजी चिरायु हॉस्पिटल येथे दुपारी २ ते ३वाजे च्या दार्मियान आले असता त्या ठिकाणी बाळाची डिस्चार्ज कार्ड व कागदपत्र बघून त्यास ॲडमिट करण्यात आले त्याची इतर तपासण्या सुद्धा करण्यात १७०० रु घेऊन करण्यात आल्या व पाच हजार रुपये डिपॉझिट सुद्धा घेण्यात आले मध्यरात्री साडेबारा वाजता अशी काय घटना लक्षात आली की त्या बाळाला त्वरित वार्ड तून बाहेर काढण्यात आले. एवढेच नव्हे तर तुम्हाला जळगाव मध्ये कोणीही ऍडमिट करणार नाही जर निघत नसाल तर पोलिसाना बोलून तुम्हाला बाहेर काढू अशी धमकी देऊन तुम्ही पोसिटीव बाळाला आमच्या कडे ऍडमिट का केले असे रागात बोलले.रात्री साडेबाराला त्या बालकाला पालकांनी कुठे घेऊन जावे कारण की तेव्हा त्याला ऑक्सिजन लावलेले होते.

दोघी हॉस्पिटल व डॉक्टरांची चौकशी होऊन कारवाई करणे बाबत

डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात बाल रोग तज्ञ विभागाचे हेड ऑफ द डिपार्टमेंट डॉक्टर तसेच बाल विभागाचे डॉक्टर यांची ची चौकशी करून त्यांच्यावर त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच चिरायु हॉस्पिटल ने सुद्धा त्या बाळाला १० तास ऍडमिट ठेवून मध्यरात्री साडेबारा वाजता हॉस्पिटल मधून काढले त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जळगाव कॉविड केअर युनिटचे जनसंपर्क प्रमुख फारुक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.