Home विदर्भ आलेगांव परिसराला चक्रीवादळासह गारपीट,मुसळधार पावसाचा तडाखा , ” शेकडो वृक्ष उन्मळून पडले”

आलेगांव परिसराला चक्रीवादळासह गारपीट,मुसळधार पावसाचा तडाखा , ” शेकडो वृक्ष उन्मळून पडले”

212

आमदार नितीन देशमुख यांनी नुकसान पिकाची केली पाहणी.

शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे लाखो रुपयांचे नुकसान

चोंढी,चारमोळी गावांचे पूल तुटल्यामुळे संपर्क तुटला. 

परिसरातील निर्गुणा नदी,नाल्याला महापूर

अकोला / आलेगांव – आलेगांव परिसरामध्ये दि १३ रोजी रात्री ८-३० वाजताच्या दरम्यान चक्रीवादळा सह कुठे,मुसळधार,तर चारमोळी,चोंढी मध्ये ढगफुटी पावसाने जवळपास ४५ मिनिटे धुमाकूळ घातल्यामुळे चारमोळी,चोंढी,आलेगांव, पिंपळडोळी,चरणगाव,डोलारखेड,चीचखेड,वरणगाव,आदी नदी नाल्या तीरावरील शेतकऱ्यांच्या शेतपिकांना मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.नुकसान ग्रस्त भागाला बाळापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार नितीनजी देशमुख यांनी भेट देऊन उपस्थित अधिकाऱ्यां नुकसान शेतीचे सर्व्हे करण्याचे आदेश दिले.
पातूर तहसील अंतर्गत येत असलेल्या आलेगांव परिसरामध्ये दि १३ रोजी रात्री ८-३० वाजता दरम्यान चक्रीवादळा सह मुसळधार पावसाने धुमाकूळ घातल्याने आलेगांव, चारमोळी,चोंढी,पिंपळडोलीडोलारखेड,चीचखेड,चरणगाव, वरणगाव, शेत शिवारामध्ये नदी नाल्यांचे पाणी गेल्याने शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. चारमोळी,चोंढी,नदीवरील पूल तुटल्यामुळे आलेगावा सोबत संपर्क तुटल्यामुळे ग्रामस्थाना मोठी अडचण निर्माण झाली आहे.सदरची बाब शिवसेना पातूर तालुका प्रमुख रवींद्र मूर्तडकर यांनी आमदार नितीन देशमुख यांना कळवताचआमदार नितीन देशमुख यांनी चारमोळी,चोंढी,आलेगांव आदी नुकसान भागाची पाहणी करून उपस्थित संबंधित अधिकारी यांना नुकसान शेतीचा तात्काळ सर्व्हे करण्याचे आदेश दिले.तसेच चोंढी येथील चंद्रकांत लठाड यांच्या घराला पुराचा तडाखा बसल्याने मोठे नुकसान झाले.नुकसान भेटी दरम्यान महसूल उपविभागीय अधिकारी निलेश अपार, तहसीलदार डॉ दीपक बाजड,समाधान वाघ (गतविकास अधिकारी)विजय राठोड,( मंडळ अधिकारी) तलाठी सबनीस,बडेरे,कृषी अधिकारी व कर्मचारी आदींची उपस्थिती होती.तसेच पातूर पंचायत समिती सभापती सौ लक्ष्मीबाई डाखोरे, नजमुनीसा शे इब्राहिम (उपसभापती) अजय ढोणे(पं,स,शिवसेना गटनेता) सोमिनाथ बोबडे (शिवसेना प्रसिद्धी प्रमुख) शिवसेना कार्यकर्ते वशेतकरी बांधव उपस्थित होते.