Home जळगाव वघाडी गावातील रस्ता दुरुस्तीचे काम शिवसैनिकांच्या सहकार्याने तात्काळ सुरू…..

वघाडी गावातील रस्ता दुरुस्तीचे काम शिवसैनिकांच्या सहकार्याने तात्काळ सुरू…..

270

रावेर (शरीफ शेख)

रावेर तालुक्यातील वघाडी गावातील रस्ता हा खूप मोठ्या प्रमाणात खराब झाला होता, यामुळे संबंधित गावकऱ्यांना जाणे येणे सह शेतकऱ्यांना ही
वाहतूक करणे सुध्दा जिकिरीचे झाले होते, यामुळे सर्व सामान्य माणसाला दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली होती,
या रस्त्याची दुरवस्था झालेली असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता, याकडे संबंधित ग्रामपंचायतीचे सोयीचे दुर्लक्ष होत असल्याने, गावकऱ्यांसमोर मोठी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली होती, पण ह्या वघाडी गावातील दुर्लक्षित , दुरवस्था असलेल्या रस्त्यांची स्थिती,व गावकऱ्यांची व्यथा निंभोरा तांदलवाडी जिल्हा परिषद गटाचे शिवसेना गट प्रमुख युवा सेनेचे कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते भैय्या पाटील यांनी शिवसेना युवा नेते, आमदार चंद्रकांत पाटील तथा जिल्हाप्रमुख शिवसेना यांचे अत्यंत विश्वासू सरदार , संवेदनशील, कर्तव्य दक्ष शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते श्री छोटू पाटील,रेंभोटा गावांचे माजी सरपंच यांच्या कानावर सदर प्रत्यक्ष परिस्थिती वघाडी गावातील रस्ता शेवटची घटका मोजत आहे, त्या रस्ता दुरुस्तीचे काम गावकरी, शेतकरी सह सर्व सामान्य जनतेच्या भल्यासाठी तात्काळ दुरूस्ती करणे सुध्दा अत्यावश्यक आहे, याविषयीची विंनती श्री छोटू पाटील यांना केली, आणि एका क्षणाचाही विलंब न करता, भैय्या पाटील शिवसैनिक यांच्या विनंतीवरून श्री छोटू पाटील यांनी तातडीने दुरावस्था झालेल्या रस्ता दुरुस्तीचे काम स्व खर्चाने कच्चे डांबर,वा मुरुम टाकण्याचं लोकाभिमुख कार्य तात्काळ प्रत्यक्षात सुरू केले, आणि संबंधित वघाडी गावातील नागरिकांना सुखद धक्का दिला,
तसेच खरा जनसेवक हा,फोटो शेसन करण्यासाठी धडपडत नाही,तर फक्त लोकहितासाठी संवेदनशीलता दाखवून जबाबदारी तत्परतेने पार पाडण्यासाठी नेहमीच झटत असतो, ह्याचाही प्रत्याय वघाडी गावातील नागरिकांनी अनुभव ला, तसेच गावकऱ्यांनी सदर भैय्या पाटील, छोटू पाटील यांच्या कार्याचे कौतुक करुन आभार मानले.