Home विदर्भ गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला , “बजरंग दलाच्या माध्यमातूून”

गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला , “बजरंग दलाच्या माध्यमातूून”

221

रवींद्र साखरे

तळेगांव (शा.पं.) – राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव पासुन चार कि.मी. अंतरावरील खडका फाट्या जवळ नादुरुस्त अवस्थेत असलेला गुरांचा ट्रक क्रं. MP 28- H- 0311 बजरंग दल व शिवसेना कार्यकर्त्याच्या सतर्कतेमुळे पकडला. यातील ट्रक चालक व एक मजुर ट्रक सोडून फरार झाला परंतु क्लिनर अश्पाक रफीक शेख रा. पिलीनदी, नागपुर हा ट्रक जवळ सापडला आहे. याची माहिती तळेगांव पोलीस स्टेशनला दिली असता पोलिसांनी गुरांचा ट्रक ताब्यात घेवुन गुरांना टाकरखेड येथील गोशाळेत रवाना केले . त्यात एकुन३५ गुरे त्यापैकी २५ गाई व १० बैल कोंबलेल्या स्थितीत जिवंत आढळून आल्या.


नागपुरवरुन भरधाव वेगाने अवैधरित्या गुरांची वाहतूक करणारा ट्रक अमरावतीकडे जात होता परंतु खडका फाट्यानजीक अचानक ट्रकमध्ये बिघाड आल्याने सदर ट्रक रोडच्या कडेला उभाकरुन चालक व मजुर ट्रक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीत होते त्याचवेळेस तिवसा येथील बजरंग दलाचे दोन कार्यकर्ते रोडने जात असतांना त्यांना संशय आल्याने त्यांनी ट्रकची पाहनी केली असता ट्रक मध्ये चक्क काेंबलेल्या अवस्थेत गुरे आढळुन आली. याची माहिती त्यांनी तळेगाव येथील बजरंग दल व शिवसेनेच्या कार्यकर्त्याना दिली असता याची भनक लागताच चालक व एक मजुर यांनी त्वरीत घटना स्थळावरु पोबारा केला. मात्र ट्रकच्या कॅबीनमध्ये बसुन असलेला क्लिनर याला बजरंग दल व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तेथेच थांबवुन सदर घटनेची माहिती तळेगाव पोलीस स्टेशनला दिली .ठानेदारासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होवुन ट्रकसह त्याला ताब्यात घेतले.

या राष्ट्रीय महामार्गावरुन दररोज खुलेआम अवैध गुरांची तस्करी होत असते. परंतु अशाप्रकारच्या कोणत्याही वाहनाला आजपर्यंत पोलीस पकडु शकले नाही फक्त नादुरुस्त किंवा अपघातग्रस्त झालेल्या अशा वाहनानंवरच नाईलाजाने कारवाई करण्यात आली आहे.

भर पावसात बजरंग दल व शिवसेनेच्या कार्यकत्यांनी केली मदत

यावेळी पाऊस चांगलाच सुरू होता, या भर पावसात बजरंग दल व सेनेच्या कार्यकर्त्यांनी गाईंना पशुवैद्यकीय कर्मचाऱयांना बोलावून त्यांचा प्राथमिक उपचार केला यावेळी सर्व युवकांनी या गाईंना चाऱ्याची सुद्धा सोय केली . या गुरांना टाकरखेड येथे पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.