Home जळगाव राजनंदिनी बहूद्देशीय संस्थेतर्फे उपक्रमशील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

राजनंदिनी बहूद्देशीय संस्थेतर्फे उपक्रमशील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

103
0

रावेर (शरीफ शेख) 

जळगाव येथील सामाजिक,शैक्षणिक व इतर अनेक क्षेत्रात विविध उपक्रम राबविणारी सेवाभावी संस्था राजनंदिनी बहुद्देशीय व कुणबी मराठा वधुवर ग्रुप गौरी उद्योग समृह संस्थेतर्फे राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधत उपक्रमशील शिक्षकांना २०२०-२१ या वर्षाचे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय गृप चे चेअरमन तथा गौरी गृप वावडदा येथील अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सुमित पाटील हे उपस्थित होते.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करीत प्रातिनिधिक स्वरूपात चार शिक्षकांना प्रत्यक्ष व जिल्ह्यातील इतर उपक्रमशील शिक्षकांना घरपोच पुरस्काराचे सन्मानपत्र पाठविण्यात आले. शिक्षक नवीन पिढी घडविण्यासोबतच देशाचे भविष्य देखील घडवत असतात त्यामुळे अशा उपक्रमशील शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार वाटप केल्याचे संस्थेच्या अध्यक्षा एस. डी. वाघ यांनी सांगितले , प्रमुख पाहुणे सुमित पाटील यांनी शिक्षकांना शुभेच्छा देत अभिनंदन केले व म्हटले की अशा पुरस्कारांमुळे शिक्षकांना अधिक प्रेरणा मिळत असते व त्यांच्याकडून अधिक उत्तम कार्य घडत असते. यावेळी उपक्रमशील शिक्षक संदिप मधुसूदन पाटील,योगेश भालेराव,भारती सोनार , किशोर पाटील यांना प्रातिनिधिक स्वरूपात पुरस्कार वाटप करण्यात आले.