Home विदर्भ देवळी पोलीस स्टेशन मध्ये पोलीस पाटील व समाज सेवक यांचा गौरव.!

देवळी पोलीस स्टेशन मध्ये पोलीस पाटील व समाज सेवक यांचा गौरव.!

307

योगेश कांबळे

पोलीस पाटील यांच्या घेतल्या जाईल प्रत्येक तक्रारीची दखल , “ठाणेदार लेव्हरकर यांचे स्पष्टीकरण”

वर्धा – देवळी पोलिस स्टेशन अंतर्गत कोरोना महामारी विरुद्ध शासन,पोलीस दल यांना बरोबर घेवू न सामाजिक कार्य करुन कोवीड 19या रोगाविषयी जनजागृती करणार्‍या सामाज कार्यकत्यां सोबतच पोलीस पाटलांचा गुरुवारी 10 सप्टेंबर रोजी सत्कार करण्यात आला.
समाज प्रबोधन व समाज जागृती या कार्यात बरोबर राहुन पोलीस पाटील यांनी व त्यांना मदत करणार्या समाजसेवक यांनी कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल घेत ठाणेदार नितीन लेव्हकर यांनी पोलीस पाटील व समाज सेवक यांचा प्रमाणपञ देवून गौरव केला.
या कार्य क्रमात शोसल डिस्टन्स ठेवून पोलिस पाटील,त्यांचे पाल्य जे दहावी बारावी उत्तीर्ण झाले, त्याचे मनोधैर्य वाढावे व पुढे शिक्षणात उंच भरारी घेवून समाजाप्रती काहीतरी सेवा करण्याची जवाबदारी म्हणून शासकीय सेवेत येवून पोलीस पाटील यांची मान उंचावण्याची संधी प्राप्त करावी या करीता पोलीस पाटील यांचे पाल्यांना दहावी बारावीत जे गुणानु क्रमे उतीर्ण झालेत त्यांना प्रमाण पञ देवून गौरविल्या गेले.
यावेळी पोलीस पाटील यांची मने हेलावून गेली होती. सत्कार संमारंभात ठाणेदार नितीन लेव्हरकर यांनी पोलीस पाटील यांना संबोधन करतांना सांगितले की आपल्या कुठल्याही तक्रारीची दखल घेतल्या जावून आपणास योग्य तो सन्मान दिल्या जाईल. पोलीस पाटील यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाला सहकार्य करावे.
प्रत्येक पोलीस पाटील यांनी स्वतःची आचारसंहिता तयार करावी व ती मोडू नये समाजातील लोकांना पोलीस पाटलां कडून न्यायाची अपेक्षा असते.
कोरोणा महामारीत पाटलांनी जे उत्कृष्ट कार्य केले ते खरोखरच अंभिनंदनीय असून पुढे ही आपण सकारात्मक रहाल याबद्दल शंका नसल्याचे लेव्हरकर यांनी सांगितले.
कार्य क्रमाचे संचालन श्री बुटे यांनी केले.
यावेळी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष रमेश ढोकणे, पोलीसपाटील हेमंत ढोले, अरविंद कांबळे, किरण होरे,जनार्दन भगत , विश्वेश्वर लाबंट, कल्पना महल्ले, उषा डहाके,पपीता मुन, स्मिता थुल, दिपीका वाघमारे सामाजिक कार्यकर्ता रमेश धुमाळ यांच्या सह इतर पोलीस पाटील व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.