Home नांदेड जब प्यार किया तो ड रना क्या ???

जब प्यार किया तो ड रना क्या ???

405

जब प्यार किया तो ड रना क्या ???

पोलिसांनी ठोकल्या बेड्या ,

अमीन शाह

नांदेड : स्वतः च्याच घरी चोरी करून 1 लाख 72 हजाराच्या ऐवजासह पलायन केलेल्या प्रेमी युगुलास लोहा पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांना 11 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
लोहा तालुक्यातील किरोडा येथील एका तरुणीचे आदेश खरे नावाच्या तरुणासोबत सूत जुळले. त्यानंतर आना भाका घेत जीवनभर सोबत राहण्याचा निर्णय घेतला. परंतु पळून जाण्यासाठी पैशाची अडचण कशी दूर करणार यासाठी दोघांनी मिळून चोरीचा संकल्प केला तोही प्रेयसीच्या घरीच.ठरल्या प्रमाणे दोघांनी संकल्प करून 5 सप्टेंबर रोजी सांयकाळी घराचे कुलूप तोडून प्रेयसीच्या घरात दोघांनी प्रवेश करून कपाटातील नगदी 7 हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 1 लाख 72 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज लंपास करून पलायन केले. याप्रकरणी प्रेयसीच्या मातेने दिलेल्या फिर्यादी वरून लोहा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अधिक चौकशीअंती प्रेमी युगुल पोलिसांच्या तावडीत सापडले.त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून लंपास केलेला ऐवज जप्त केला.