Home विदर्भ ‘कुणी घर देता काहो , “घर”

‘कुणी घर देता काहो , “घर”

259

निराधार , विधवा महिलेची घरकुलासाठी शासन दरबारी पायपीट

नरेन्द्र कोवे – वडकी

यवतमाळ / राळेगाव , दि. १० :- कुटूंबातुन हद्दपार व्हावं लागलेल्या काही स्त्रियांच्या कहाण्या हादरून सोडणाऱ्या आहेत. मुळात स्त्रियांना स्वतःची ओळख नसतेच असलीच तर ती अमक्याची सौभाग्यवती , तमक्याची आई , आणखी कुणाची तरी मुलगी… अशीच. कर्तबगार स्त्रियांच्या नावामागेही सौ. अशी उपाधी असणे हे मोठं भाग्याचं लक्षणं समजलं जातं. बाईच्या साऱ्या आयुष्याच्या वर्तुळाचा मध्यबिंदू नवराच असायला हवा असं आपल्याला ठामपणे वाटत असतं.
पण बरेचदा असं होतं नाही. पती निधनानंतर साध्या घरकुलासाठी ‘कुणी घर देता काहो घर’ असा टाहो फोडत शासनाचे उंबरठे झिझवनाऱ्या मिराबाईची ही करून कहाणी

राळेगाव तालुक्यात येत असलेल्या मौजा वडकी येथे मीराबाई नाना तोडसाम ही दलित – मागास वस्तीतील झोपडीवजा घरात राहते. दुर्धर आजाराने ग्रस्त झालेल्या पतीने लवकरच अगदी उमदीच्या काळातचं मिराबाईचा कायमचा साथ सोडला. मिराने मोल – मजुरी करून दोन मुलांचा सांभाळ केला तर भविष्यातील सुखी जीवनाची स्वप्ने रंगवली. परंतु नियतीला हे सुद्धा मान्य नव्हते. औषध उपचारात आर्थिक ताकदीने कमी पडल्याने मिराचा मोहन हा तीचा लहान मुलगा सोडून गेला.
लोकांच्या घरची धुनी – भांडी करित मिराने कसबस पवनला मोठं केलं. परंतु पवनला आईला धरून राहणं काही जमलं नाही.
पवन घरजावई बनुन घाटंजी – त कायमचा राहायला निघून गेला.

परिवारिक आणि आर्थिक संकटाने पिचलेल्या मिराबाईने आज वयाची सत्तरी ओलांढली आहे. ती आजही राहते पक्क्या घराविनाचं. घरकुल मागणीसाठी आताही शासनाचे उंबरठे झिजवत आहे. उमद्या काळापासून आजतागत आजही तिचा घरकुल मागणीसाठी लढा कायम आहे.
आज केंद्र आणि राज्यस्तरावर महिला सबलीकरना संमधीत नाना – विविध अनेक योजना कार्यान्वित आहे. मागेल त्याला घ

रकुल योजना आहे व देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी ह्यांनी घरकुला वाचुन कुनी राहू नये, असा चंग बांधला आहे. परंतु ह्या साऱ्या बाबी सुशिक्षिताना ज्ञात आहे.
ती अनेक पांढरपेशा जवळ आपली कैफियत मांडते.

प्रत्येक जण तिच्या दारापुढे येवून योजनांचा पेटारा खोलतो परंतु प्रत्येकक्षात मदत करणारा आजतागत पुढे आला नाही.
तिच्याकडे स्वतःच एकच मत असल्यामुळे ही दुरावस्था निर्माण झाली नाही ना !
अशाही शंकेला वाव मिळू लागला आहे. पण काहीही असो प्रत्येकाकडे आशेचा किरण लावुन आज पण ती बघते आहे आणि मनोमनी म्हणत असेल,’कुणी घर देता काहो घर’….!!