Home जळगाव फिरोज शेख यांना कोरोना वीर पुरस्काराने सन्मानित

फिरोज शेख यांना कोरोना वीर पुरस्काराने सन्मानित

49
0

रावेर (शरीफ शेख) 

जळगांव तांबापुरा भागातील रहिवासी व मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख यांना कोरोनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोरोना संकटकाळात पोलीस बांधवांना व गरजू नागरिकांना मास्क वाटप, सिरसोली रोड वरील झोपडपट्टी भागात खिचडी वाटप तसेच शहरातील अत्यंत गरजू नागरिकांना किराणा वाटप करण्यात आले. त्याच बरोबर कोरोना बाबत जनजागृती व जळगांव शहरात व ग्रामीण भागात कोविड केअर हेल्प ग्रुपच्या माध्यमातून विविध ठिकाणीआरोग्य तपासणी करण्यात आली.मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनच्या उल्लेखनीय कार्या बद्दल धरणगाव येतील कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पाळधी येथे नोबेल इंटरनॅशनल स्कूलच्या आवारात छोट्याखाणी सन्मान सोहळा कार्यक्रमात धरणगाव पोलीस स्टेशनचे स.पो.नि.हनुमंत गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी संस्था अध्यक्ष सुनील चौधरी,सुनील झंवर चेअरमन स.न.झंवर विद्यालय पाळधी,स्वप्नील उपाध्याय मॅनेजर अपोलो टायर,अतुल सूर्यवंशी,प्रशांत सुर्यवंशी ,अर्चना सुर्यवंशी संचालक नोबेल इंटरनॅशनल स्कूल पाळधी आदी उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting