Home विदर्भ मुकुंदपूर पारधी बेडा येथे पोलीस मित्र परिवार समितीची भेट

मुकुंदपूर पारधी बेडा येथे पोलीस मित्र परिवार समितीची भेट

242

यवतमाळ  – दि. 29/8/2020 रोजी पोलीस मित्र परिवार समितीचे जिल्हा समन्वयक डॉ. विवेक चौधरी,रविकुमार दुधकोर,संतोषभाऊ वाघाडे यांनी मृत नयनसिंग पवार यांचे घरी प्रत्यक्ष भेट दिली…

सदर ठिकाणी घडलेल्या घटनेच्या अगोदर मेश्राम यांच्या शेतात मूक जनावरे विजेच्या जिवंत तारेने मरण पावले,त्याला ग्रामस्थ व मुकुंदपूर वासी यांनी वारंवार हटकूनही तारांवर आकोडे टाकून वीज चोरी करून शेताच्या पानदान रस्त्यावर ज्या ठिकाणी मजूर व पारधी मजूर जाणे – येणे करतात त्या ठिकाणी लावत…पण त्या दिवशी जणू नयन वर काळानेच झडप घेतली व एक हुशार पारधी समाजाचा मुलगा मुकुंदा मेश्राम व गोपाळ मेश्राम यांच्या हलगर्जी व वीज चोरीमुळे मरण पावला. तसेच त्या ठिकाणी नेर पोलीस यांनी तपशील केला असून प्रकरण चौकशीत आहे परंतु मृतक यांचे घरापर्यंत अद्यापही कोणत्याही अधिकारी,तहसीलदार यांनी भेट दिली नाही असा भेदभाव पारधी समाज सोबत का??? असा प्रश्न उपस्थित होतो…ग्रामस्थांनी एक मताने सांगितले की जर आमच्या परिवाराला न्याय भेटला नाही आणि नयन च्या मृत्यूला जबाबदार असणारे मुकुंदा मेश्राम व गोपाळ मेश्राम यांना अटक केली नाही तर आम्ही मुकुंदपूर वासी पारधी समाज प्रशासनाला जबाबदार मानून आंदोलन करू यासाठी प्रशासन जबाबदार असेल असा इशारा सर्वेश पवार,प्रदीप पवार,अजय पवार,राजेश पवार,जगदीश भोसले,राज भोसले,समीर भोसले,शामा भोसले,आडेवार भोसले इ.उपस्थित होते…