Home मराठवाडा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चाचे तमिजोद्दीन इनामदार यांनी कार्यकर्तेसह राजीनामे दिले

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चाचे तमिजोद्दीन इनामदार यांनी कार्यकर्तेसह राजीनामे दिले

36
0

औरंगाबाद / बिडकीन , दि. ०९ ( प्रतिनिधी ) :- केंद्र सरकारकडुन सातत्याने अल्पसंख्याकविरोधी धोरणे राबविली जात आहे.शिवाय अल्पसंख्याक कार्यकर्तेकडे पक्षकडुन दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करित मराठवाडय़ातील भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या अनेक पदाधिकारी यांनी राजीनामे दिल्याचे सञ चालु असतांनाच .बिडकीन येथे गुरुवारी ता.०९ रोजी पञकार परिषदेत देण्यात आली.तसेच या पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी प्राथमिक सदस्यत्वाची सुद्धा राजीनामा दिले आहे.राजीनामा दिलेल्या पदाधिकारी यांनी सांगितले,की आम्ही पक्षासोबत एकनिष्ठेने काम करित होतो.अल्पसंख्याक समाजात पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न केला,माञ पक्षाकडुन वारंवार अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात धोरणे राबविली जात आहेत.तीन तलाक कायदा,मुस्लीम समाजाला शैक्षणिक आरक्षण न देणे,सीएए तसेच एनआरसी व एनआरपी जेएनयु व जामिया विद्यापीठ येथील हा निष्पाप विद्यार्थी यांच्यावर झालेला हल्ला,राष्ट्रीय एकात्मतेला घातक असलेल्या कारणाने व भाजपा यांच्या ध्येय धोरणात मुस्लिम समाज तसेच सर्व अल्पसंख्याक नागरिक नाराज असल्यामुळे, अशा विवीध कारंणामुळे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी अल्पसंख्याक समाजाला काम करणे अवघड होत आहे.त्यामुळे राजीनामे दिले.बिडकीन येथे पञकार परिषदेत अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तमिजोद्दीन इनामदार व कार्यकर्ते यांनी आपला राजीनामे अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा अध्यक्ष नबी पटेल यांच्या कडे पाठविले अाहे.अशी माहिती दिली.याप्रसंगी अमर चाउस,इक्रामोद्दीन इनामदार,असलम हवालदार,अयाज शेख,मुस्तफा बागवान,समदखा पठाण,सय्यद इरफान,खालेद चाउस,जुबेर बागवान,सलिम शेख,अब्दुल शेख,जमिर इनामदार, आदींची उपस्थिती होती.

Unlimited Reseller Hosting