Home मराठवाडा अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या जिल्हा कोषाध्यक्षपदी – पांडुरंग आनंदे महाराज

अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या जिल्हा कोषाध्यक्षपदी – पांडुरंग आनंदे महाराज

470

लक्ष्मण बिलोरे- घनसावंगी

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील मासेगाव येथील रहिवासी आणि जांबसमर्थ येथील ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप पांडुरंग आनंदे महाराज यांची अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या जालना जिल्हा कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अखिल भारतीय वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष हभप नवनाथ आंधळे महाराज आणि प्रदेशाध्यक्ष हभप अनिल वाळके महाराज यांच्या शिफारशीनुसार वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश बोधले महाराज डिकसळकर यांनी पांडुरंग आनंदे महाराज यांची नियुक्ती केली आहे.त्यांच्या नियुक्तीचे वारकरी संप्रदाय, विविध प्रकारच्या धार्मिक, अध्यात्मिक संस्था, गावोगावच्या भजनी मंडळ , नागरिकांनी स्वागत केले आहे.