Home विदर्भ ति ऑनलाईन वेबसाईड वर शोधत होती जोडीदार , अन तो मिळाला ही...

ति ऑनलाईन वेबसाईड वर शोधत होती जोडीदार , अन तो मिळाला ही मात्र ???

344

 

पोलिसांनी ठोकल्या बेड्या ,

अमीन शाह ,

 

अमरावती ,

एका मॅट्रिमोनी साईटवर दोघांची ओळख झाली होती. आपण बी टेक केले असून अमेरिकेत नोकरी केलेली आहे असे त्या तरुणाने तिला सांगितले आणि तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. काही कालावधीत त्यांच्यात प्रेम झाले आणि दोघांनी लग्न देखील केले मात्र लग्न झाल्यावर त्याचा मोबाईल एके दिवशी सहज त्याचा मोबाईल पत्नीच्या हाती लागला अन त्याचा भांडा फूटला आणि त्यात इतर देखील काही तरुणींचे आक्षेपार्ह फोटो तिला आढळले, त्यामुळे ती पुन्हा माहेरी आली.
उच्चभ्रू तरुणीची फसवणूक करून तिचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा सदर तरुणाविरुद्ध अमरावती येथील गाडगे नगर पोलीस स्टेशन हद्दीत दाखल झाला असून आरोपी शेख शुभान शेख शरिफ ऊर्फ शहनशाह शेख शरीफ (रा. संतोषनगर, हैदराबाद, राज्य तेलगंणा) यास बेड्या ठोकण्यात आल्या आहेत .
उपलब्ध माहितीनुसार, आरोपी शेख शुभान शेख शरिफ ऊर्फ शहनशाह शेख शरीफ यानं ‘जीवनसाथी’ या विवाह नोंदणी वेबसाईटवर तरुणीशी संपर्क साधला. हैदराबाद येथील शेख शुभान याने आपण अविवाहित असल्याचं सांगून पीडितेला विवाहाचा प्रस्ताव दिला होता. आपण बी टेक केल्यानंतर सायंटिस्ट म्हणून अमेरीकेला नोकरी केली आहे, असे देखील त्याने सांगितले होते. मुलीचा आणि तिच्या घरच्यांचा यावर विश्वास बसला आणि त्यांचा विवाह पार पडला.

विवाह झाल्यानंतर तिला त्याचे वागणे खटकत होतेच मात्र नंतर तिचा संशय पक्का झाला आणि तिने एकदा त्याचा मोबाईल मिळवला. त्याचा मोबाईल हाती लागताच तिला धक्काच बसला . आपल्या पतीच्या इतर तरुणींसोबतच्या रंगलीला पाहून तिच्या पायाखालची वाळूच सरकली. तिने त्याला जाब विचारला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले त्यातून भांडणे होऊन पत्नी पुन्हा तिच्या माहेरी अमरावतीला निघून आली.

अमरावतीला येऊन तिने दिलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी शेख शुभान शेख शरिफ ऊर्फ शहनशाह शेख शरीफ (रा. संतोषनगर, हैदराबाद, राज्य तेलगंणा) याच्याविरुध्द लैंगिक शोषणासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे.

आरोपीची अधिक माहिती काढली असता त्याने यापूर्वी हैद्राबाद, बंगळुरू, तामिळनाडू, अलिगढ, कोलकाता येथील 7 तरुणींची अशाच प्रकारे फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. शेख सुभान याच्याविरुद्ध हैदराबाद येथे देखील बलात्कार व 7 मोबाईल चिटिंगचे गुन्हे दाखल आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 29 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी दिली आहे.

Previous articleवाह रे हैवान बाप , ????
Next articleराजेश भांगे यांना पितृशोक
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.