Home विदर्भ यवतमाळ जिल्हात 90 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर “दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु”

यवतमाळ जिल्हात 90 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर “दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु”

913

जिल्ह्यातील 83 जणांची कोरोनावर मात

यवतमाळ, दि. 26 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या 83 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 90 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली.

मृत झालेल्या दोन जणांमध्ये दारव्हा शहरातील 86 वर्षीय पुरुष आणि महागाव तालुक्यातील 84 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात 24 तासात नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 90 जणांमध्ये 49 पुरुष आणि 41 महिला आहेत. यात पुसद शहरातील नऊ पुरुष व नऊ महिला, पुसद तालुक्यातील एक पुरुष, वणी शहरातील तीन पुरुष व एक महिला, वणी तालुक्यातील एक पुरुष, आर्णि शहरातील दोन पुरुष व एक महिला, दिग्रस शहरातील नऊ पुरुष व दहा महिला, दिग्रस तालुक्यातील दोन पुरुष, महागाव तालुक्यातील एक पुरुष, उमरखेड शहरातील चार पुरुष, यवतमाळ शहरातील 10 पुरुष व 12 महिला, बाभुळगाव तालुक्यातील एक पुरुष, दारव्हा तालुक्यातील दोन महिला, घाटंजी शहरातील दोन पुरुष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील चार पुरुष व चार महिला पॉझेटिव्ह आले आहेत. 

सद्यस्थितीत जिल्ह्यात 649 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर 232 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 2915 झाली आहे. यापैकी 1964 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 70 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 190 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने बुधवारी 345 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 44851 नमुने पाठविले असून यापैकी 43282 प्राप्त तर 1569 अप्राप्त आहेत. तसेच 40367 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

Previous articleसोनीयाच्या पावलांनी महालक्ष्मी बसलेल्या……!
Next articleप्रेम असावा तर असा ????
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.