Home जळगाव प्रियेश महाजन उपजिल्हाधिकारी निवडी निमित्ताने त्यांचा रावेर राष्ट्रवादी पदवीधर संघांच्या वतीने सत्कार...

प्रियेश महाजन उपजिल्हाधिकारी निवडी निमित्ताने त्यांचा रावेर राष्ट्रवादी पदवीधर संघांच्या वतीने सत्कार ….

239

रावेर (शरीफ शेख)

रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथील रहीवाशी
लखुचंद तोताराम महाजन यांचे पुत्र श्री प्रियेश महाजन यांची राज्यसेवा परीक्षा 2019 यात उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली आहे . सध्या श्री प्रियेश महाजन हे पुणे येथील वस्तू व सेवा कर विभागात सहाय्यक राज्यकर आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे शालेय शिक्षण मोठे वाघोदा येथील प्रकाश विद्यालय तसेच नंतरचे शिक्षण नवोदय विद्यालय भुसावळ येथे झालेले आहे त्याच प्रकारे त्यांनी मॉडन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे येथून इंजिनिअरिंग कम्प्लीट केले आणि त्यानंतर ते दोन वर्ष ideacellular या कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत होते त्यानंतर सेल्सटॅक्स डिपारमेंट मध्ये सेल्सइन्स्पेक्टर म्हणून काम करत होते राज्यसेवा 2017 मध्ये त्यांना मुख्याधिकारी गट-ब या पदावर नियुक्ती झाली .नंतर राज्यसेवा परीक्षा 2018 मध्ये सहाय्यक राज्यकर आयुक्त गट अ पदी यांची निवड झाली आणि सध्या ते सहाय्यक राज्यकर आयुक्त पुणे येथे कार्यरत आहेत.त्यांच्या यशामध्ये आई-वडील बहीण नातेवाईक आणि मित्रपरिवार यांचा फार मोठा वाटा आहे. अभ्यासात सातत्य तसेच मेहनत करण्याची तयारी आणि संयम त्रिसूत्री त्यांच्या यशासाठी कारणीभूत ठरली आहे.त्यांचे वडील लखूचंद तोताराम महाजन ऊचंदे येथील सेवानिवृत्त आय टी आय मध्ये शिल्पनिर्देशक होते. तसेच पदवीधर संघांचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्री पुंडलिक पाटील यांच्या आदेशानुसार
तालुकाध्यक्ष रावेर राष्ट्रवादी पदवीधर संघांच्या हस्ते श्री महाजन यांचे कौतुक व आनंद व्यक्त करून अभिनंदन पर हार्दिक शुभेच्छा देवून या प्रसंगी कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विलास ताठे, योगेश पाटील सह मान्यवर मंडळी उपस्थित होते .