
रजनीकांत पाटील
अमळनेर :- तालुक्यातील वावडे येथील शेतकऱ्याने चार दिवसांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सदर शेतकऱ्याचा काल दि. २३ रोजी मृत्यू झाला आहे.
दिपक नाना ठाकरे (वय ३५) असे या मयत शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्याकडे सात बिघे शेती होती. त्यांच्यावर खाजगी सावकार व बँकेचे कर्ज असल्याची चर्चा गावात आहे. सदर शेतकरी संततधार पावसामुळे यंदाचा हंगाम ही वाया गेल्याच्या विवंचनेत होता. चार दिवसांपूर्वी सदर शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन केले होते. त्यांच्यावर धुळे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र काल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.











































